Rules Change : ATM पासून ते GST पर्यंत, 1 मे पासून होतील हे 4 मोठे बदल

Rules Change : 1 मे 2023 पासून अनेक नियम बदलणार आहेत. त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल. गॅस सिलेंडरपासून अनेक क्षेत्रात बदल होतील. त्याशिवाय एटीएमसंबंधी नियमात बदल होईल.

Rules Change : ATM पासून ते GST पर्यंत, 1 मे पासून होतील हे 4 मोठे बदल
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 12:02 PM

नवी दिल्ली : एप्रिल महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. 1 मे पासून अनेक क्षेत्रात बदल (Rule Changes) दिसून येतील. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर पडेल. गॅस सिलेंडरच्या किंमतीत (Gas Cylinder Price) बदल होऊ शकतो. वस्तू आणि सेवा करांपासून (GST) ते म्युच्युअल फंडासंबंधीच्या नियमात बदलाचे वारे आहे. 1 मे रोजी तुमच्या मोबाईलवरील कॉल आणि एसएमएस संबंधी सर्वात फायदेशीर बदल होत आहे. त्यामुळे तुमची नकोशा कॉल्सपासून सूटका होणार आहे. आता कॉल आणि फसवणुकीच्या एसएमएसच्या जाळ्यात कोणी अडकणार नाही.

Mutual Fund KYC बाजार नियामक संस्था सेबीने (SEBI) म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्यांना नियमांचे पालन करण्याची ताकीद दिली आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांना ई-वॉलेटचा वापर करण्यासाठी, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. हा नियम 1 मे पासून लागू होणार आहे. केवायसीसाठी तुमचा पॅनकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँकेचा संपूर्ण तपशील द्यावा लागेल. यासंबंधीचा एक अर्ज ही भरावा लागेल.

जीएसटी नियमांत बदल 1 मे पासून व्यापारांना, व्यावसायिकांना जीएसटीमध्ये मोठा बदलाची पूर्तता करावी लागणार आहे. आता 100 कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांसाठी हा नियम आहे. त्यानुसार, या कंपन्यांनी व्यवहाराची पावती सात दिवसांत इनवॉयस रजिस्ट्रेशन पोर्टलवर (IRP) अपलोड करणे आवश्यक आहे. हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. अजून यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला नाही.

हे सुद्धा वाचा

गॅस सिलेंडरच्या किंमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमती निश्चित करतात. 1 एप्रिल रोजी सरकारने 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांची कपात केली होती. एका वर्षात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 225 रुपयांची कपात झाली आहे. 1 मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत मोठा बदल दिसून आला.

ATM बाबत मोठा बदल देशातील सर्वात मोठी सरकारी बँकेतील एक पंजाब नॅशनल बँकेने एटीएमच्या व्यवहाराशी संबंधित काही नियमांत बदल केला आहे. नवीन नियम 1 मे पासून लागू होतील. जर ग्राहकांच्या खात्यात शिल्लक रक्कम नसेल आणि एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न झाला तर ग्राहकाला 10 रुपयांसह जीएसटी शुल्क द्यावे लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या संकेतस्थळावर नोटीस काढून याविषयीची माहिती दिली आहे.

ग्राहक घेतील मोकळा श्वास TRAI, ग्राहकांना या नकोशा कॉल्सपासून वाचविणार आहे. तसेच खोट्या एसएमएसपासून मुक्ती देणार आहे. त्यासाठी आभासी तंत्रज्ञानाचा, म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI Filter) वापर करण्यात येईल. या यंत्रणेमुळे नेहमी सतावणाऱ्या कॉल्सची, एसएमएसची ओळख पटेल आणि तुमच्या फोनपर्यंत हे कॉल्स येणारच नाहीत. नेटवर्कवरच हे कॉल्स फिल्टर होतील. त्यासाठी 1 मेपासून मोठे बदल करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.