Vande Bharat : केवळ रंगच नाही, नवीन वंदे भारतचे बदलले रुपडे, सुविधांचा उघडला पेटारा
Vande Bharat : वंदे भारत आता वेगवान भारताची ओळख झाली आहे. आरामदायक आणि गतीमान प्रवासासाठी वंदे भारतची मागणी वाढणी आहे. वंदे भारतचे रुपडे ही बदलले आहे. आता प्रवाशांना अनेक सुविधा ही मिळतील.
नवी दिल्ली : वंदे भारत (Vande Bharat Train) आता वेगवान भारताची ओळख झाली आहे. आरामदायक आणि गतीमान प्रवासासाठी वंदे भारतची मागणी वाढणी आहे. वंदे भारतचे रुपडे ही बदलले आहे. केवळ रंगच नाही, तर प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार आहे. अनेक राज्यांकडून वंदे भारतची मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ही ट्रेन सुरु पण झाली आहे. भाडे जास्त असल्याने प्रवाशी रोडावले होते. पण रेल्वे मंत्रालयाने भाडे कपातीची घोषणा केली आहे. त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. कमी कालावधीत, कमी पैशांमध्ये वंदे भारतमधून तुम्हाला झटपट गंतव्य स्थान गाठता येणार आहे.
दोन रंगात न्हाऊन निघाली वंदे भारत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी नवीन वंदे भारतचे छायाचित्र शेअर केली. यामध्ये वंदे भारतचा रंग बदलला आहे. आतापर्यंत ही रेल्वे पांढऱ्या आणि निळ्या रंगात होती. आता नवीन वंदे भारत रेल्वे नारिंगी आणि राखाडी रंगात न्हाऊन निघाली आहे. चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत (ICF) ही रेल्वे तयार होत आहे. चाचणीसाठी हा रंग निवडण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर हा रंग अंतिम करण्यात येईल.
पुढील वर्षांत धावणार रेल्वे नवीन वंदे भारत पुढील वर्षी ट्रॅकवर धावतील. वंदे भारतमध्ये केवळ रंगच बदलणार आहे, असे नाही. याशिवाय नवीन वंदे भारतमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत. माहितीनुसार, नवीन वंदे भारतमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. दिव्यांगासाठी मोठी सुविधा देण्यात आल्या आहेत. तर प्रवाशांसाठी अनेक सुविधा मिळणार आहेत.
काय काय झाला बदल नवीन वंदे भारतचे सीट आता मोठे असतील. तसेच ते 360 डिग्रीमध्ये फिरवता येईल. त्याला आराम आसन व्यवस्था करता येईल. झोप आली तर प्रवाशांना सीट मागे घेऊन आराम करता येईल. सीट अजून आरामदायक आणि नरम करण्यात आले आहेत. त्यामुळे दूरच्या प्रवासात प्रवाशांना थकवा जाणवणार नाही.
या सुविधा मिळतील मोबाईल चार्जिंग पॉईंट मिळेल. एक्झिक्युटिव्ह चेअरचा फुट रेस्ट एरिया वाढविण्यात आला आहे. तसेच स्वच्छता, चांगली प्रकाश योजना आणि इतर सुविधा मिळतील. तसेच दिव्यांगाना व्हीलचेअर घेऊन ते फिट करण्यासाठी फिक्सिंग पॉईंट्स मिळतील.
एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वे एकाचवेळी 5 वंदे भारत ट्रेन सुरु करत आहे. हा कार्यक्रम येत्या 26 जून रोजी होत आहे. वंदे भारत आता मुंबई-गोवा, बंगळुरु-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदुर आणि भोपाळ-जबलपूर या मार्गावर धावेल. ऑगस्ट 2024 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.