आता ईएमआय चुकला तरी बॅंकांना व्याजासह दंड लावता येणार नाही, काय आहे आरबीआयचा नवा निर्णय

रिझर्व्ह बॅंकेने योग्य कर्ज व्यवहार -कर्ज खात्यांवर दंडात्मक शुल्काबाबत शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे.

आता ईएमआय चुकला तरी बॅंकांना व्याजासह दंड लावता येणार नाही, काय आहे आरबीआयचा नवा निर्णय
cashImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 4:14 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : आता तुमचे कर्जाचे हप्ते चुकले तरी तुम्हाला फारसी चिंता करण्याची गरज नाही. कारण यापुढे आपले कर्जाचे हप्ते चुकले तर बॅंकांना भरसाठ व्याजासह दंड आकारता येणार नाही. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ( RBI आरबीआय ) अशा प्रकारे ग्राहकांकडून वसुल केल्या जाणाऱ्या दंडात्मक व्याजावर चिंता व्यक्त केली आहे. बॅंका आणि गैर बॅंकींग वित्तीय कंपन्यांनी आपला महसूल वाढविण्यासाठी याचा वापर केल्याने आरबीआयने आता नवीन सुधारित नियम जारी केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, दंडात्मक व्याज आकारण्यामागाचा हेतू लोन वेळेत फेडण्याबाबत ग्राहकांमध्ये शिस्त आणणे हा असतो. त्याचा वापर बॅंकांनी आपला महसूल वाढविण्यासाठी करु नये.

काय आहेत नवीन नियम

– नवीन नियम कर्ज फेडण्यात आलेल्या त्रूटीबाबत असतील

– आता बॅंका संबंधित ग्राहकांवर योग्य दंडात्मक शुल्क लावू शकतात

– बॅंकांना आता दंडात्मक व्याज आकारता येणार नाही

– हा नवा नियम जानेवारी 2024 पासून लागू होणार

– दंडात्मक शुल्काचे गुंतवणूक किंवा भांडवल म्हणून वापर करता येणार नाही

– या शुल्क आकारणीवर अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही.

हे आदेश या बाबीला लागू नाहीत

रिझर्व्ह बॅंकेने योग्य कर्ज व्यवहार -कर्ज खात्यांवर दंडात्मक शुल्काबाबत शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना बॅंकांना तसेच अन्य कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था पाठविण्यात आली आहे. आता बॅंका दंडात्मक व्याजाला आगाऊ आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांमध्ये जोडले जाते. रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे की दंडात्मक शुल्क योग्य हवे, ते उत्पादन श्रेणीत पक्षपाती व्हायला नको. आरबीआयचे हे नवे आदेश क्रेडीट कार्ड, बाह्य वाणिज्यिक कर्ज, व्यापार क्रेडीट आदीवर लागू होणार नाही.

Non Stop LIVE Update
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?.
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी.
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा.
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा.
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले....
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले.....
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात.
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला....
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला.....
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?.
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?.
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.