घरबसल्या विका जुने स्मार्टफोन… जाणून घ्या फ्लिपकार्टचा नवीन प्रोग्राम
आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण वाढल्याने मोठ्या प्रमाणावर ई-कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. फ्लिपकार्टच्या या नवीन प्रोग्राममुळे स्मार्ट फोन विकणे अधिक सोपे होणार आहे.
नवी दिल्ली : ज्यांना आपला जुना स्मार्ट फोन विकायचा आहे, त्यांनी जरा थांबून फ्लिपकार्ट (Flipkart) ॲप घेऊन आलेल्या एका नवीन प्रोग्रामबद्दल जरूर माहिती जाणून घेतली पाहिजे. कारण फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ‘सेल बॅक’चा (Sell Back) प्रोग्राम ऑपशन आपल्या ॲपमध्ये आणला आहे. ज्यांना त्यांचे जुने स्मार्टफोन ऑनलाइन विकायचे आहेत, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम (program) अतिशय उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट व्हाउचरच्या रूपात बायबॅक किंमत दिली जाणार आहे. हा नवीन फ्लिपकार्ट प्रोग्राम आता दिल्ली, कोलकाता आणि पाटणा सारख्या शहरांमध्ये 1,700 पिन कोडवर थेट उपलब्ध राहणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनुसार, हा प्रोग्राम सर्व मोबाइल फोनसाठी उपलब्ध राहणार आहे. संबंधित मोबाइलची फ्लिपकार्टवर खरेदी केली असो किंवा नसो तरी याचा लाभ घेता येणार आहे.
फ्लिपकार्टच्या ‘सेल बॅक’ प्रोग्रामच्या घोषणेनंतर, Yaantra नावाचे इलेक्ट्रॉनिक्स री-कॉमर्स प्लॅटफॉर्म विकत घेतले गेले आहे. IDC च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 125 मिलियन वापरलेले फोन विक्रीसाठी उपलब्ध असतात, त्यापैकी फक्त 20 दशलक्ष फोन बाजारात पोहोचतात. या ई-कचऱ्याची समस्या सोडवणे गरजेचे होते. दरम्यान, हे ऑपशन फ्लिपकार्टच्या ॲपवरुन वापरता येणार आहे. ॲपला स्क्रोल केल्यानंतर सर्वात खाली हा ऑपशन युजर्सना दिसू शकेल.
असा विका ऑनलाइन फोन
स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट अॅप उघडावे, त्यानंतर सर्वात खाली स्क्रोल करून ‘सेल बॅक’ पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तीन प्रश्नांची उत्तरे देऊन ग्राहक संबंधित फोनची संपूर्ण किंमत जाणून घेता येईल. यानंतर, फ्लिपकार्ट एक्झिक्युटिव्हला 48 तासांच्या आत हँडसेट घेण्याचे काम दिले जाईल. एकदा पडताळणी झाल्यानंतर, खरेदीदाराला काही तासांत फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हाउचर जारी केले जाईल. हे व्हाउचर प्लॅटफॉर्मवर काहीही खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
ई-कचऱ्याची मोठी समस्या
’फ्लिपकार्ट’चे ग्रोथ चार्टर आणि वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रमुख प्रकाश सिकारिया यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग झपाट्याने विकसित होत असताना, यातून ई-कचऱ्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. हा कचरा करमी करण्यासाठी हा प्रोग्रामचे लॉन्च करण्यात आला आहे. चांगली अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी एक आवश्यक पाऊल असल्याचे सिकारिया यांनी सांगितले आहे.
इतर बातम्या
फेसबुकचा नवा निर्णय ‘न्यूज फीड’ आता केवळ ‘फीड’… काय आहे कारण?
Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या