Online Transaction : डेबिट-क्रेडिट कार्डने करा बिनधास्त व्यवहार, CVV ची सक्ती संपली

Online Transaction : क्रेडिट आणि डेबिट कार्डने आता बिनधास्त व्यवहार करा. पूर्वी कार्ड क्लोनिंगची भीती होती. त्यामुळे फसवणूक होण्याची भीती होती. पण आता CVV ची सक्ती संपली आहे.

Online Transaction : डेबिट-क्रेडिट कार्डने करा बिनधास्त व्यवहार, CVV ची सक्ती संपली
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 6:35 PM

नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : डेबिट वा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार (Online Transaction) करणे सोपे आहे. कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) ची माहिती न देता आता ऑनलाईन व्यवहार करता येणार आहे. पूर्वी कार्ड क्लोनिंगची होत होती. त्यामुळे फसवणूक होण्याची भीती होती. आता क्रेडिट आणि डेबिट कार्डने बिनधास्त व्यवहार करता येणार आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याविषयी बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी टोकनायझेशनची पद्धत लागू केली होती. मास्टरकार्डने पण आता चेकआऊट पटकन होण्यासाठी नवीन सेवा सुरु केली आहे. मास्टरकार्ड वापर करणाऱ्यांना मर्चेंट प्लॅटफॉर्मवर टोकनाईजचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यासाठी युझर्सला आता सीव्हीव्ही क्रमांक सांगण्याची गरज उरली नाही.

CVV मुक्त मोहिम

मास्टरकार्डच्या दाव्यानुसार, कॅश फ्री पेमेंट्ससाठी आणि झोमॅटो सारख्या भारतीय कंपन्यांनी यापूर्वीच सीव्हीव्ही क्रमांक विना ऑनलाईन व्यवहार सुरु केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला व्हीसा सारख्या कंपन्यांनी पण वापरकर्त्यांना CVV मुक्त मोहिमेचा लाभ दिला. Rupay ने पण डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डधारकांना CVV मुक्त सेवेचा लाभ सुरु केला.

हे सुद्धा वाचा

काय आहे CVV क्रमांक?

सीव्हीव्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पाठीमागे तीन अंक असतात. तिलाच CVV क्रमांक म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने टोकनायझेशनचा पर्याय समोर आणला आहे. त्याआधारे ग्राहकांना आता त्यांच्या कार्डचा संपूर्ण तपशील, त्यांचा पत्ता सांगण्याची गरज उरली नाही.

काय आहे टोकनायझेशनचा अर्थ

टोकनायझेशनचा अर्थ डेबिट अथवा क्रेडिट कार्डची मुळ माहिती एका कोडमध्ये बदलणे होय. मुळ तपशील कोडमध्ये बदलण्यात येतो. कोडलाच टोकन म्हणतात. या टोकनमध्ये कोर्डचा तपशील देण्यात येतो. ही माहिती डेबिट-क्रेडिट कार्ड कंपन्यांकडे पाठवण्यात येतो. या कंपन्या हा तपशील कोडमध्ये रुपांतर करतात. ही प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते. त्यामुळे ग्राहकांना या प्रक्रियेत कुठलाही उशीर होत नाही.

टोकनायझेशन असे करा

  • ज्या ठिकाणाहून खरेदी करायची आहे, अशा कोणत्याही ई-कॉमर्स मर्चंट वेबसाईट वा अॅपवर जा. याठिकाणी पेमेंटची प्रक्रिया सुरु करा
  • तुमच्या कार्डचा पर्याय निवडा. चेकआऊट करताना यापूर्वी जतन, सेव्ह केलेल्या डेबिट-क्रेडिट कार्डचा तपशील टाका आणि इतर माहिती द्या
  • कार्डची माहिती सुरक्षित करा. त्यानंतर ‘सिक्योर योर कार्ड अॅझ पर आरबीआई गाइडलाइन’ अथवा टोकनाइज योर कार्ड अॅझ पर आरबीआई गाइडलाइन हा पर्याय निवडा
  • टोकनसाठी सहमती द्या. बँकेकडून तुमचा मोबाईल अथवा ई-मेलवर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी क्रमांक टाकून व्यवहार पूर्ण करा.
  • त्यानंतर टोकन जनरेट करा. टोकन जनरेट होईल. तो सेव्हही होईल. तुम्ही दिलेला तपशील टोकन रुपात बदलले. त्यानंतर जेव्हाही तुम्ही संबंधित वेबसाईटवर जाला. तेव्हा तुमच्या कार्डचे शेवटचे चार आकडे दिसतील. हेच टोकनायझेशन आहे.

कार्डमार्फत किती व्यवहार

भारतात ऑनलाईन व्यवहारात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डची महत्वपूर्ण भूमिका आहे. 31 मे, 2022 रोजीपर्यंत जवळपास 92 कोटी डेबिट कार्ड जारी करण्यात आले होते. तर मार्च 2023 पर्यंत ई-कॉमर्स मध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 63% अधिकचा खर्च झाला होता.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.