UPI Limit : आता वॉलेटमध्ये ठेवा जादा पैसा; RBI ने वाढवली युपीआय लाईट पेमेंटमध्ये रक्कमेची मर्यादा

UPI lite Wallet : RBI ने युनिफाईड पेमेंट इंटरफेस अजून सुविधाजनक आणि सर्वसामान्य लोकांसाठी सोपं करण्यासाठी पाऊल टाकलं आहे. युपीआय व्यवहारात दिवसागणिक मोठा बदल होत आहे. त्यात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान वा सुधारणा होत आहे. आता अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

UPI Limit : आता वॉलेटमध्ये ठेवा जादा पैसा; RBI ने वाढवली युपीआय लाईट पेमेंटमध्ये रक्कमेची मर्यादा
युपीआय लाईट
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 4:04 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी युपीआय वापरकर्त्यांना एक जोरदार गिफ्ट दिलं आहे. RBI ने ऑफलाईन डिजिटल पेमेंटसाठी आता व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. युपीआय लाईटमध्ये व्यवहाराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता नागरिकांना युपीआय वॉलेटमध्ये 2000 रुपयांऐवजी 5000 रुपये जमा ठेवता येतील. त्यामाध्यमातून त्यांना व्यवहार करता येईल. या बदलाचा शहरीच नाही तर ग्रामीण भागातील जनतेला मोठा फायदा होणार आहे.

UPI Lite ची वाढली मर्यादा

याशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी युपीआय लाईटची मर्यादा 500 रुपयांहून वाढवून ती 1000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ऑफलाईन व्यवहाराची एकूण मर्यादा 2000 रुपये आहे. आता युपीआय लाईटच्या माध्यमातून जनतेला 5000 रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. त्यामुळे लहान-सहान व्यवहार झटपट करता येतील. पाच हजार रुपयांपर्यंत पेमेंट सुविधा असल्याने किराणा सामान आणि शेतीविषयक व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करता येईल.

हे सुद्धा वाचा

काय आहे युपीआय लाईट?

UPI Lite मधील व्यवहार ऑफलाईन होण्याचे कारण म्हणजे त्यात पडताळ्यासह फॅक्टर ऑफ आयडेंटिफिकिशनची गरज पडणार नाही. याशिवाय व्यवहाराशी संबंधित अलर्ट पण वास्तविक वेळेत, रिअल टाईममध्ये पाठवण्यात येत नाहीत. ऑफलाईन पेमेंटचा अर्थ या व्यवहारासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरनेट अथवा टेलिकॉम कनेक्टिव्हिटीची गरज पडत नाही.

यापूर्वीच केली होती घोषणा

ऑक्टोबर महिन्यात युपीआय लाईटची मर्यादा वाढवण्याची करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत याविषयीची घोषणा करण्यात आली होती. ऑफलाईन डिजिटल व्यवहार सुरळीत, सुरक्षित आणि झटपट होण्यासाठी जानेवारी 2022 मध्ये ऑफलाईन पद्धतीत अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. सरकारने या सूचना स्वीकारल्या होत्या. त्यावर अंमलबजावणीसाठी बदल करण्यात येत होते. त्यानंतर या ऑक्टोबर महिन्यात साध्या मोबाईलच्या माध्यमातून व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपोआप पैसा जमा होणार

युपीआय लाईटमधील हा बदल म्हणायला किरकोळ वाटतो. पण त्याचा मोठा परिणाम आगामी काळात दिसेल. जर युपीआय लाईटमधील पैसे कमी झाले तर ते आपोआप जमा होतील. अर्थात त्यापूर्वी तुमची परवानगी घेण्यात येईल. आरबीआयच्या या बदलामुळे वारंवार पैसा जमा करण्याची झंझट कमी होईल. बॅलन्स रक्कम कमी झाली की लाईटमध्ये डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसा जमा होईल. ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असेल.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.