Adhaar card: आता ‘ही’ दोन प्रमाणपत्रेदेखील आधारला लिंक होणार? केंद्र सरकारकडून होतेय चाचपणी…
Adhaar card: नुकत्याच हाती आलेल्या एका रिपोर्टनुसार, केंद्र सरकार उत्पन्न व जात प्रमाणपत्रदेखील आधारला लिंक करण्याच्या तयारीत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगना, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रात याची सुरुवात देखील झाल्याची माहिती आहे. इतर राज्यातदेखील याच पध्दतीने काम सुरु करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून (central government) विविध कागदपत्रांना आधार कार्डशी (Aadhaar card) लिंक करण्याचा धडाकाच सुरु झाला आहे. आता उत्पन्न दाखला व जात प्रमाणपत्रदेखील आधारला लिंक करण्यात येणार असल्याने साहजिकच आधार कार्डचे महत्व (importance ) अधिक वाढणार यात शंका नाही. काही राज्यांमध्ये याचे कामदेखील सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर हळूहळू सर्व राज्यांमध्ये याची व्याप्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, उत्पन्न दाखला व जात प्रमाणपत्र आधारला लिंक करण्यामागे केंद्र सरकाचा एक मोठा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या मते हळूहळू सर्व सरकारी योजनांना आधार कार्डशी लिंक केल्याने याचा सरळ फायदा हा लाभ घेणार्या नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे.
लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार निधी
इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जात प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला हे दोन्ही कागदपत्रे आधार कार्डशी लिंक केल्यानंतर वित्तीयदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही दोन कागदपत्र आधारला लिंक केल्याने याचा देशभरातील जवळपास 60 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
या पाच राज्यांमध्ये काम पूर्ण
एका रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेश, तेलंगाना, राजस्क्षान, कर्नाटक व महाराष्ट्रात उत्पन्न आणि जात प्रमाणपत्राला आधारशी लिंक करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता याच पध्दतीने इतर राज्यांमध्ये या योजनेला सुरुवात करण्यात येणार आहे. आधारला जात प्रमाणपत्र लिंक केल्यावर केवळ त्याच लोकांना शासकीय योजनांचा फायदा मिळू शकणार आहे.
वेळेत शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार
उत्पन्न दाखला व जात प्रमाणपत्र आधारशील लिंक केल्यावर लाभार्थींची संपूर्ण माहिती आधार नंबरच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासकीय कामातदेखील सुसूत्रता निर्माण होणार आहे. शिवाय यात बोगल लाभार्थींचा प्रश्नदेखील सुटणार असल्याचा दावा केला जात आहे. याच उदाहरण बघायच झाल्यास संतोष हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्याने आपला उत्पन्न दाखला व जात प्रमाणपत्र जर आधारशी लिंक केले, अन् नंतर त्याने एखाद्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला तर त्याठिकाणचा अधिकारी हा केवळ संतोषचा आधार क्रमांक टाकून त्याच्या आर्थिक मागासलेपण व जात प्रमाणपत्राची ओळख पटवून शिष्यवृत्तीची रक्कम सरळ संतोषच्या खात्यात जमा करेल.
संबंधित बातम्या:
जगातील सर्वाधिक महाग ‘एलपीजी’ भारतामध्ये; तो कसा? समजून घ्या त्यामागचे गणित