Hello UPI : आवाजाचा दम, झटपट होणार पेमेंट! काय आहे Hello UPI

Hello UPI : राष्ट्रीय देयके महामंडळ, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युपीआय वापरकर्त्यांसाठी खास सुविधा आणली आहे. त्यानुसार ग्राहकांना संवादाने कोणाला पण झटपट पैसे पाठवता येईल. अशी मिळेल ही सुविधा

Hello UPI : आवाजाचा दम, झटपट होणार पेमेंट! काय आहे Hello UPI
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 2:00 PM

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : भारताचे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) देशातच नाही तर जगभरात डंका वाजवत आहे. युपीआयची लोकप्रियता आता कळसाला पोहचली आहे. युपीआय अधिकाधीक युझर फ्रेंडली करण्यावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय देयके महामंडळ, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक खास फीचर उतरवले आहेत. हे फीचर जोरदार आहे. त्यामुळे टायपिंगचा कंटाळा करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना आता व्हाईस मोड पेमेंट (UPI Voice Mode Payment) म्हणजे संवादाने व्यवहार साधता येईल. त्यांना आवाजाने दुसऱ्याला पैसे पाठवता येतील. त्यासाठी मोबाईलवर बोट चालविण्याची गरज उरणार नाही. बोलून पेमेंट करता येईल. युपीआय पेमेंटमध्ये अशात अनेक फीचर जोडण्यात आले आहे. त्याचा ग्राहकांना फायदा होत आहे. त्यामुळे व्यवहारात युपीआय पेमेंटचा टक्का वाढला आहे.

आरबीआय गव्हर्नरने केले उद्धघाटन

युपीआयवर आवाजाच्या सहायाने हे पेमेंट करता येईल. त्यामुळे पेमेंटची प्रक्रिया सोपी आणि सहज होणार आहे. या सेवेला हॅलो युपीआय (Hello UPI) असे नाव देण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या नवीन फीचरचे उद्धघाटन केले. यामध्ये एप, फोन कॉल, इंटरनेट ऑफ थिंग्स यांचा वापर होत आहे. त्याआधारे ग्राहकांना सध्या हिंदी आणि इंग्रजी या भाषेत संवाद व्यवहार पद्धतीचा वापर करता येत आहे. युपीआय पेमेंटसाठी हे अनोखे फिचर आल्याने ग्राहकांना आता झटपट व्यवहार करता येईल.

हे सुद्धा वाचा

Hello UPI द्वारे करा पेमेंट

Hello UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या फीचरच्या माध्यमातून, व्हॉईस मोडद्वारे 100 रुपयांचे पेमेंट करता येईल. हॅलो युपीआय म्हणत तुम्ही ही सेवा फोनवर सुरु करु शकते. NPCI नुसार, ग्राहक पेमेंटपूर्वी बँकेकडून क्रेडिट लाईन, अर्थात पूर्व मुदत कर्ज घेऊ शकतात. त्याचा वापर करु शकतात.

असे करा पेमेंट

बँकेत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमाकावरुन संबंधीत व्यक्तीच्या बँकेला कॉल करुन बँकेचे नाव, ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे नाव सांगून नंतर युपीआय पिनचा वापर करुन पेमेंट करु शकता. सध्या ही सुविधा इंग्रजी आणि हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध आहे. लवकरच ही सेवा देशातील इतर भाषांमध्ये देण्यात येईल. त्याचा फायदा देशातील कोट्यवधी युपीआय वापरकर्त्यांना होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.