आता तुम्हीही उघडू शकता थेट RBI मध्ये खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आपण रिझर्व्ह बँकेत कधी अकाऊंट सुरू करू शकतो याचा विचार मनोज शिंदे यांनी कधीही केला नव्हता. पैशांची गुंतवणूक नक्की कोणत्या बँकेत करावी हा विचार ते नेहमी करत असतात. त्यांचा मित्र प्रणित याने (RBI) म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्याचा सल्ला दिला.

आता तुम्हीही उघडू शकता थेट RBI मध्ये खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 5:30 AM

मुंबई : आपण रिझर्व्ह बँकेत कधी अकाऊंट सुरू करू शकतो याचा विचार मनोज शिंदे यांनी कधीही केला नव्हता. पैशांची गुंतवणूक नक्की कोणत्या बँकेत करावी हा विचार ते नेहमी करत असतात. त्यांचा मित्र प्रणित याने (RBI) म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्याचा सल्ला दिला. त्यांना प्रणीत मस्करी करतोय असं वाटलं. पण मनोज शिंदे यांच्यासारख्या अनेक जणांना RBI मध्ये खातं उघडता येतं याची कल्पनाच नाही. आरबीआयमध्ये खातं कसं उघडतात याची आणखी माहिती मनोजने प्रणितकडून घेतली. त्यानंतर प्रणीतनं (RDG) म्हणजे रिटेल डायरेक्ट गिल्ट खाते उघडण्याचा सल्ला दिला. ही स्कीम सरकारनं (Government)गेल्या वर्षी सुरू केल्यामुळे जास्त लोकांना याबद्दलची माहिती नाहीये. लहान-मोठे सर्व गुंतवणूकदार या अकाऊंटमधून गुंतवणूक करू शकतात. पूर्वी लहान गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेच्या या योजनेत गुंतवणूक करू शकत नव्हते.

RDG म्हणजे नेमके काय?

RDG म्हणजे रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाऊंट म्हणजे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल, थोडक्यात सांगायचे झाल्यास मनोज शिंदे किंवा त्यांच्यासारखे सामान्य गुंतवणूकदार हे सरकारला कर्ज देऊ शकतात. किरकोळ किंवा लहान गुंतवणूकदार आता यामधून ट्रेझरी बिल्स, भारत सरकारच्या सिक्युरिटीज, सार्वभौम गोल्ड बाँड्स, राज्य विकास कर्ज म्हणजेच SDL मध्ये पैसे गुंतवू शकतात. गुंतवणूकदार आरबीआयच्या रिटेल डायरेक्टर गिल्टही फायदेशीर असल्यानं बरेचजण या स्कीमच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे या संधीचा फायदा कोणीही चुकवू नका असे आव्हान या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

खाते कसे सुरू करता येते ?

RDG मध्ये जॉइंट किंवा सिंगल खाते सुरू करता येते. खाते सुरू करण्याची प्रक्रिया समजून घेऊयात https://www.rbiretaildirect.org.in/ या वेबसाईटवर जाऊन खातं उघडता येतं, तसंच खाते सुरू करण्यासाठी पॅन कार्ड, केवायसीसाठी ओळखपत्र , ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यानंतर लगेचच तुमचे खाते सुरू होईल आणि हे खाते विना:शुल्क सुरू होते. बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल गुंतवणूकदारांचा यातून कसा फायदा होतो ? तर हो, फायदा हा होतोच खाते तर विनामूल्य आहे, शिवाय ते मेंटेन करण्यासाठी अतिरिक्त पैसे देखील भरावे लागत नाहीत. रिझर्व्ह बँक गुंतवणुकीसाठी स्पेशल ऑफर देतच असतात त्यातून तुम्हाला अधिक परतावा मिळेल. अशी माहिती Finway FSC चे CEO आणि FOUNDER रचित चावला यांनी दिलीये.

संबंधित बातम्या

इंडस्ट्रियल कॉरिडॉरसारख्या योजना जमिनीमुळे रखडल्या; जमीन हस्तांतरणासाठी राज्यांचा निरुत्साह – गोयल

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये महत्त्वपूर्ण व्यापारी करार, भारतातून निर्यात होणाऱ्या 95 पेक्षा अधिक वस्तूंचा कर माफ

भारतीय स्टार्टअप कंपन्यांना अच्छे दिन; गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 12 अब्ज डॉलर भांडवलाची उभारणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.