AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर खरेदीदारांसाठी चांगली बातमी! आता 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार गुंतवणूकीवरील करात सूट, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

कर कपातीसाठी निवासी घरात ही गुंतवणूक करण्याची मुदत पूर्वीच्या 30 जून 2021 च्या मुदतीत 3 महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. (Now you will get tax deduction on investment till September 30. Learn how to avail the benefit)

घर खरेदीदारांसाठी चांगली बातमी! आता 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार गुंतवणूकीवरील करात सूट, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ
घर खरेदीदारांसाठी चांगली बातमी! आता 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार गुंतवणूकीवरील करात सूट
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 2:46 PM

नवी दिल्ली : कोविड-19 महामारीमुळे देशभरात करदात्यांना होणार्‍या अडचणी लक्षात घेता, केंद्र सरकारने निवासी घरांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवरील कर कपातीसाठी क्लेम करण्याची मुदत वाढविली आहे. गुंतवणूकीची अंतिम मुदत 30 जून 2021 ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याद्वारे 1 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर घर खरेदी करणारे लोक कर सूटसाठी दावा करु शकतात. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. कर कपातीसाठी निवासी घरात ही गुंतवणूक करण्याची मुदत पूर्वीच्या 30 जून 2021 च्या मुदतीत 3 महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. (Now you will get tax deduction on investment till September 30, know how to avail the benefit)

वित्त मंत्रालयाचे म्हणणे आहे, कलम 54 ते 54 जीबी अंतर्गत समाविष्ट असलेल्या गुंतवणूक, ठेवी, देयके, अधिग्रहण, खरेदी, बांधकाम किंवा अशा इतर गोष्टींसाठी करदात्यांनी केलेल्या दाव्यांसाठी कर कपातीपासून सूट देण्यात आली आहे. यामध्ये, क्लेमची अंतिम तारीख आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मालमत्ता खरेदी किंवा बांधकाम केल्यावर सूट

आयकर कायदा 1962 च्या कलम 54 आणि कलम 54 जीबी नुसार निवासी मालमत्ता विकत घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी नव्याने गुंतवणूक केल्यास आपण निवासी मालमत्ता विक्री केल्यावर भांडवली नफ्यात तुम्हाला कर सूट मिळू शकते. आयकर कायद्याच्या कलम 54 जीबी अंतर्गत, आपण एखाद्या पात्र कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या वर्गणीसाठी रक्कम गुंतविल्यास निवासी मालमत्तेच्या हस्तांतरणास प्राप्त झालेल्या भांडवलाच्या नफ्यातून सूट दिली जाईल.

2 कोटींपेक्षा कमी मालमत्तांवर मिळेल लाभ

केंद्रीय अर्थसंकल्प 2019 ने कलम 54 अंतर्गत भांडवली नफ्यातील सूट मर्यादा वाढविली होती. त्याअंतर्गत आता दोन निवासी घरे खरेदी करण्यास किंवा बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, मालमत्तेचे मूल्य 2 कोटींपेक्षा कमी असेल तरच कर सवलत मिळेल. करदाता केवळ एकदाच हा पर्याय वापरू शकतो. यापूर्वी केवळ एक खरेदी किंवा उत्पादनास परवानगी होती.

विवाद से विश्वासची मुदतदेखील वाढविण्यात आली

शासनाने चालवलेल्या विवद से विश्वास योजनेंतर्गत विना व्याज परतफेड करण्याची अंतिम मुदतदेखील वाढविण्यात आली आहे. आता ही 2 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वी ती 30 जूनपर्यंत होती. (Now you will get tax deduction on investment till September 30, know how to avail the benefit)

इतर बातम्या

केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाविकासआघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न: जयंत पाटील

ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनाही आता व्ही.पी.सिंग यांची आठवण का येतेय? वाचा सविस्तर

2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय.
फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?
फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?.
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला....