नवी दिल्ली- महागाईनं शिखर गाठलेल्या काळात एका रुपयात येणार तरी काय? असा प्रश्न तुम्हाला भेडसावू शकतो. घरगुती वापराच्या काडेपेटीचा दर दोन रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. मात्र, तुम्ही आता एका रुपयांत तब्बल दोन लाखांचे विमा सुरक्षा कवच प्राप्त करू शकतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा विमा (PMJAY) योजनेला आरंभ केला. प्रत्येकाला विम्याचा लाभ मिळावा हे योजनेचे प्रधान उद्दिष्ट आहे. अल्प उत्पन्न गटातील नागरिकही विमा योजनेच्या कक्षेत यावे यासाठी योजनेची आखणी करण्यात आली. सरकारद्वारे अत्यंत माफक प्रीमियम मध्ये जीवन विमा प्रदान केला जातो.
विमा योजनेची वैशिष्ट्ये:
अल्प उत्पन्न गटातील नागरिक विमा योजनेच्या कक्षेत येण्यासाठी सरकारने योजना आखली.योजनेचे वार्षिक प्रीमियम 12 रुपये आहे. केवळ महिन्याला 1 रुपये प्रीमियम स्वरुपात अदा करावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा सर्वांगीण हात या योजनेद्वारे उपलब्ध होतो.
अपघात संरक्षण
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेद्वारे विमाधारकाला अपघाती मृत्यूच्या स्थितीत तसेच संपूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत दोन लाखांचे विमा संरक्षण प्राप्त होते. तर आंशिक अपंगत्वाच्या स्थितीत एक लाखांच्या विम्याचे कव्हर प्राप्त होते. संपूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत म्हणजे दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात गमावणे, एक हात किंवा एक डोळे तसेच एक पाय गमाविण्याच्या स्थितीत दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदातीची तरतूद करण्यात आली आहे.
नोंदणी कालावधी:
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा नोंदणी कालावधी हा 1 जून ते 31 मे पर्यंतचा असतो.
प्रीमियमचे पेमेंट:
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना केवळ 18 ते 70 वयोगटाच्या लाभार्थ्यांसाठीच आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे अकाउंट असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. एकाधिक बँक अकाउंच्या स्थितीत तुम्ही केवळ एकाच अकाउंटद्वारे लाभ घेऊ शकतात. प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यापासून ‘आॕटो डेबिट’ सुविधेद्वारे तुमच्या अकाउंटमधून कपात केली जाईल.
योजनेच्या माहितीचा स्त्रोत:
योजनेविषयी संपूर्ण माहिती या लिंकवर उपलब्ध असेल. तसेच अन्य भाषेतही अर्ज याठिकाणी उपलब्ध असतील.
http://www.jansuraksha.gov.in/Files/PMSBY/Hindi/ClaimForm.pdf 97-2021-12-22