UPI Circle: एका युपीआय अकाउंटवरुन घरातील पाच लोकांना पेमेंट करता येणार, आरबीआयने दिली नवीन सुविधा

upi payment new system: सेंकडरी युजरला विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रत्येक पेमेंटसाठी प्रायमरी खातेधारकाच्या परवानगीची गरज नाही. परंतु मर्यादेपेक्षा जास्त पेमेंटसाठी मंजुरी लागणार आहे. त्याच्याकडून मंजुरी मिळाल्याशिवाय पेमेंट प्रक्रिया पूर्ण होणार नाही. या व्यवहारासाठी UPI पिन आवश्यक आहे.

UPI Circle: एका युपीआय अकाउंटवरुन घरातील पाच लोकांना पेमेंट करता येणार, आरबीआयने दिली नवीन सुविधा
UPI
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 6:33 PM

तुमचे बँकेत खाते नाही. परंतु तुमच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीकडे युपीआय म्हणजेच युनिफाइड इंटरफेस पेमेंट सिस्टम आहे, तर तुमच्यासाठी नवीन फिचर सुरु झाले आहे. आता एका युपीआय अकाउंटवरुन पाच जणांना पेमेंट करता येणार आहे. युपीआय सर्कल नावाचे हे फीचर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरु केले आहे. नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) हे फीचर लॉन्च केले आहे. यामुळे तुमचे युपीआय अकाउंट परिवारातील पाच सदस्यांसोबत शेअर करता येणार आहे.

काय आहे ही सुविधा

एका युपीआय अकाउंटचा वापर परिवारातील पाच सदस्यांच्या पाच मोबाईल क्रमांकावर करता येणार आहे. या माध्यमातून एका दिवसांत 5,000 रुपये तर एका महिन्यात 15,000 रुपयांचा व्यवहार करता येणार आहे. घरात एकाच व्यक्तीचे बँक खाते असते. परंतु घरातील महिला, वृद्ध किंवा मुलांचे बँकेत खाते नसेल तर त्यांना आता युपीआयचा वापर करता येणार आहे. कोणताही युपीआई युजर आपल्या डिजिटल पेमेंट्ससाठी सेकेंडरी युजरची निवड करु शकतो.

दोन पद्धतीचे युजर

युपीआई सर्कलमध्ये दोन प्रकारचे युजर असणार आहे. त्यात पहिला युजर प्रायमरी आणि दुसरा सेकंडरी असणार आहे. सेंकडरी युजरला पूर्ण किंवा मर्यादीत भाग वापरण्याची सुविधा असणार आहे. प्रायमरी युजर कोणाला सेंकडरी युजर बनवू शकतो. त्याला सेंकडरी युजरला पूर्ण पेमेंट किंवा मर्यादित पेमेंट पर्याय देखील देता येईल. म्हणजे सेंकडरी युजरला पेमेंट करण्यासाठी मर्यादा लादता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सेंकडरी युजरला विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रत्येक पेमेंटसाठी प्रायमरी खातेधारकाच्या परवानगीची गरज नाही. परंतु मर्यादेपेक्षा जास्त पेमेंटसाठी मंजुरी लागणार आहे. त्याच्याकडून मंजुरी मिळाल्याशिवाय पेमेंट प्रक्रिया पूर्ण होणार नाही. या व्यवहारासाठी UPI पिन आवश्यक आहे. भारतीय युपीआय आता देशात नाही, विदेशात सुरु झाले आहे. अनेक देशांनी त्याला मान्यता दिली आहे.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.