Online Fraud | ऑनलाईन फसवणुकीला आळा, टोकनायझेशनचा उतारा, माहिती करुन घ्या उपाय आहे तरी काय

Fraud | इंटरनेट आणि ऑनलाईनमुळे जगात क्रांती आली. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार ही वाढले. घटना वाढल्याने त्याला टोकनायझेशनच्या माध्यमातून पायबंद घालण्यात येत आहे.

Online Fraud | ऑनलाईन फसवणुकीला आळा, टोकनायझेशनचा उतारा, माहिती करुन घ्या उपाय आहे तरी काय
टोकनायझेशनमुळे व्यवहार सुरक्षितImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 10:10 AM

Online Fraud | इंटरनेटमुळे व्यापार आणि व्यवहार ऑनलाईन (online Transaction) झाला आहे. काही सेकंदात व्यवहार करणे सोपे झाले असल्याने ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण कित्येक पटीने वाढले. तसे फसवणुकीचे (Online Fraud) प्रकारही वाढले. सायबर क्राईम वाढले. नेट बॅकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॅलेट्स, युपीआय या माध्यमातून फसवणूक वाढली. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने टोकनायझेशनचा (Tokenization) उपाय सुरु केले आहे.

सुरक्षेचा उपाय

ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या मागणीमुळे डेटा सुरक्षेच्या उल्लंघनाच्या अनेक घटना घडल्या. या घटनात वाढ झाली आहे. सायबर सुरक्षेचे धोके वाढल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने उपाय योजना ही केल्या आहेत. कार्डचे टोकेनायझेशन हा एक नवीनतम सुरक्षा उपाय आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना आता आर्थिक फसवणुकीचा धोका कमी होईल.

टोकनायझेशनची गरज का?

तुम्ही ज्या वेळी ई-कॉमर्स अॅप वा वेबसाईटवर काही खरेदी कराल. त्यावेळी तुमच्याकडून क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डचा तपशील मागण्यात येतो. कार्डची एक्सपायरी डेट विचारली जाते. तुमचे संपूर्ण नाव, पत्ता याची ही माहिती विचारली जाते. त्यामुळे पुढील व्यवहार करताना तो सोपा होतो. पण यामुळेच ऑनलाईन व्यवहारातील सुरक्षा धोक्यात येते.

हे सुद्धा वाचा

हॅकिंगचा फटका

एखाद्यावेळी मर्चंट वेबसाईटवर सायबर हल्ला झाला. डेटा हॅक झाला तर तुम्ही सेव्ह केलेल्या डेटा आधारे तुमच्या आर्थिक व्यवहारांवरुन सायबर भामटे माहिती काढतात. फेक रिक्वेस्ट अथवा इतर माध्यमातून तुमची फसवणूक करतात. त्यामाध्यमातून तुमच्या खात्यातील रक्कम काढण्यात येते.

टोकनायझेशनचा प्रवास

या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी टोकनायझेशनचा वापर करण्यात येणार आहे. मार्च 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेने टोकनायझेशन वापरण्याची शिफारस केली होती. ही सेवा लागू करण्यासाठी सप्टेंबर 2021 हा महिना निश्चित करण्यात आला होता. ही तारीख वाढवण्यात आली. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे.

टोकनायझेशन म्हणजे काय?

टोकनायझेशनच्या माध्यमातून तुमच्या कार्डचा तपशील एका वैकल्पिक एनक्रेप्टेड कोडमध्ये बदलण्यात येते. प्रत्येक टोकन कार्ड, मर्चंट आणि ग्राहकांच्या व्यवहार पूर्ण करते. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन व्यवहार करता अथवा पेमेंट करता त्यावेळी टोकनच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण होतो.

केव्हा होणार सुरुवात

1 ऑक्टोबर 2022 रोजीपासून ग्राहक जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करेल तेव्हा कार्डने व्यवहार करताना त्याला टोकनायझेशन करण्यासाठी सांगण्यात येईल.

ही सेवा बंधनकारक आहे का?

कार्ड टोकनायझेशन अनिवार्य नाही. ग्राहक म्हणून तुम्हाला टोकनायझेशन करायचे की नाही याची मुभा तुम्हाला असेल. पण सुरक्षेसाठी टोकनायझेशन वापरणे तुमच्याच फायद्याचे राहिल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.