तुम्ही आधार कार्ड कितीदा अपडेट करू शकता; काय आहे युआयडीएआयचा नियम? जाणून घ्या
आधार कार्डचा समावेश प्रमुख कागदपत्रांमध्ये (Important Documents) होतो. आधार कार्डची इतर महत्त्वाच्या कागदपत्रांशी तुलना केल्यास आधार कार्ड हे सर्व कागदपत्रांपेक्षाही महत्त्वाचे ठरते. अनेकदा आधार कार्डमध्ये राहिलेल्या चुकांच्या दुरूस्तीसाठी आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागते. आज आपण जाणून घेणार आहोत की अशाप्रकारे आधार कितीदा अपडेट करता येते.
मुंबई : आधार कार्डचा समावेश प्रमुख कागदपत्रांमध्ये (Important Documents) होतो. आधार कार्डची इतर महत्त्वाच्या कागदपत्रांशी तुलना केल्यास आधार कार्ड हे सर्व कागदपत्रांपेक्षाही महत्त्वाचे ठरते. कुठलेही सरकारी काम असेल तर आधार कार्ड हे आवश्यकच असते. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर अनेक योजनांच्या लाभापासून आपण वंचित राहून शकतो. कारण प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक करण्यात आले आहे. तुम्हाला जर लायन्स काढायचे असेल, मतदान ओळखपत्र हवे असेल, बँकेत खाते ओपन करायचे असेल, पॅन कार्ड काढायचे असेल अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची गरज असते. इतकेच नाही तर आधार हा एक प्रमुख ओळखीचा पुरावा देखील आहे. तुम्ही जेव्हा तुमचे आधार कार्ड तयार केले, तेव्हा त्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या असतात. काही वेळा नाव चुकते, काही वेळा राहण्याचे ठिकाण देखील चुकू शकते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे आधार अपडेट करू शकता. मात्र तुम्ही तुमचे आधार कार्ड वारंवार अपडेट करू शकत नाही. त्यासाठी देखील युआयडीएआयने (UIDAI) निश्चित मर्यादा ठरून दिलेली आहे. या मर्यादेनंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये बदल करू शकत नाहीत.
आधारमध्ये तुम्ही नाव कितीदा अपडेट करू शकता?
अनेकदा आधार बनवताना नावामध्ये काही चुका राहून जातात. आधारमध्ये नाव चुकले असल्यास एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आधार अपडेट करावे लागते. तसेच मुलींच्या लग्नानंतर त्यांच्या नावात बदल होतो. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करावे लागते. मात्र तुम्ही केवळ दोनदाच तुमच्या आधार कार्डमध्ये नाव अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव अपडेट करायचे असेल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रासह आधारच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट द्यावी लागते.
आधारमध्ये पत्ता फक्त एकदाच अपडेट करू शकता
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील पत्त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही केवळ एकदाच आधार कार्डवरील पत्ता अपडेट करू शकता. त्यामुळे आधार कार्डवरील पत्ता अपडेट करताना तो बिनचूक झाला आहे का? याची विशेष काळजी घ्या.
संबंधित बातम्या
रशिया – युक्रेन युद्धाचा भारताला फटका, विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च!
तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा
पुढील आठवड्यात इंधन दरवाढ; पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?