PAN-Aadhaar Link : तुमचे पॅन आधार कार्डला लिंक आहे? नसेल तर आजच करा लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर
सीबीडीटीद्वारे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च, 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अद्याप देखील वेळ गेलेली नाही, तुम्ही 31 मार्च, 2023 पर्यंत पॅन आधारला लिंक करू शकता.
मुंबई : आधार पॅन लिंकिंग (PAN-Aadhaar Link) बंधनकारक करण्यात आले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज (CBDT) कडून आधारला पॅन लिंक करण्यासाठी 31 मार्च, 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र तुम्हाला आजून देखील आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. सीबीडीटीद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार तुम्ही जर 30 जून 2022 च्या पूर्वी आधारला पॅन लिंक केले तर तुमच्याकडून पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येईल. मात्र तुम्ही जर 30 जून 2022 नंतर आधारला पॅन लिक केले तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. सीबीडीटीकडून आधारला पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च, 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तुम्ही जर 30 जून 2022 नंतर 31 मार्च, 2023 पर्यंत आधारला पॅन लिंक केले तर तुम्हाला त्यासाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु तुम्ही जर 31 मार्च, 2023 नंतर देखील आधारला पॅन लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रिय (Inactive)होईल.
पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होणार?
तुम्ही जर तुमचे पॅन कार्ड 31 मार्च, 2023 पर्यंत आधारला लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या जाणून शकतात. भारतामध्ये जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारामध्ये पॅन कार्डची आवश्यकता असते. बँकेत खाते सुरू करयचे असेल तरी देखील तुमच्याकडे पॅन कार्डची विचारना केली जाते. इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड जर निष्क्रिय झाले तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अडचणी टाळण्यासाठी पुढील 31 मार्चपर्यंत आधारला पॅन लिंक करण्याचे आवाहन सीबीडीटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आधारला पॅन लिंक करण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम इनकम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर www.incometax.gov.in जावे
- इनकम टॅक्सची वेबसाईट ओपन झाल्यानंतर Link Aadhaar या पर्यावर क्लिक करा तिथे एक नवे पेज ओपन होईल
- तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची डिटेल्स तसेच तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागले
- सगळी माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी सबमिट केल्यानंतर Validate या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला तिथे लेट फीस भरावी लागेल, फीस भरल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होईल.