PAN-Aadhaar linking : उरलेत आता केवळ 2 दिवस; पॅन-आधारची करा जोडणी, नाहीतर होईल अशी कारवाई

PAN-Aadhaar linking : गेल्या काही वर्षांत पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीसाठी अनेकदा संधी देण्यात आलेली आहे. आता या 31 मेपूर्वी जे लोक या दोन्ही कार्डची जोडणी करणार नाहीत. त्यांना उत्पन्नावर जादा टीडीएस भरावा लागेल, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

PAN-Aadhaar linking : उरलेत आता केवळ 2 दिवस; पॅन-आधारची करा जोडणी, नाहीतर होईल अशी कारवाई
पॅन-आधारची करा जोडणी
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 1:45 PM

गेल्या काही वर्षांत आधार आणि पॅन कार्ड जोडणीसंदर्भात नागरिकांना अनेकदा संधी देण्यात आली. त्यानंतर दंड लावण्यात आला. तरीही काही नागरिकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने मंगळवारी नागरिकांना पुन्हा दोन्ही कार्डच्या जोडणीचे स्मरण करुन दिले. 31 मे 2024 रोजीपूर्वी दोन्ही कार्ड जोडणीचा आग्रह धरला आहे. आयकर खात्याने सोशल मीडिया हँडल X वर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, या अंतिम मुदतीपर्यंत जे लोक हे काम करणार नाहीत. त्यांना उत्पन्नावर जादा टीडीएस कपातीचा सामना करावा लागेल.

काय केलंय ट्विट

प्राप्तिकर खात्याने नागरिकांना ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. “करदात्यांनी लक्ष द्या. 31 मे 2024 रोजीपूर्वी पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक केल्याने हे निश्चित होईल की, 31 मार्च 2024 पूर्वी करण्यात आलेल्या व्यवहारासाठी निष्क्रिय पॅनमुळे तुम्हाला आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 206एए आणि 206 सीसी अंतर्गत उत्पन्नावर उच्च कपातीचा सामना करावा लागणार नाही.” यापूर्वी 23 एप्रिल रोजी सुद्धा आयकर खात्याने दोन्ही कार्ड जोडणीची आठवण करुन दिली होती.

हे सुद्धा वाचा

काय होईल नुकसान

पॅन-आधार कार्डची जोडणी न केल्यास मोठे नुकसान

सर्वात अगोदर तुम्हाला विलंब केल्याबद्दल दंड भरावा लागेल

तुम्हाला आयकर विभागाकडून कोणताही रिफंड, परतावा मिळणार नाही

पॅन कार्ड बंद असल्याने तुम्हाला व्याज मिळणार नाही

करदात्याकडून अधिक टीसीएस, टीडीएस वसूल करण्यात येईल

असे तपासा लिकिंग

तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.

स्टेप 1: सर्वात अगोदर, आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे. त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावे लागेल

स्टेप 2: याशिवाय तुम्हाला 10 आकड्यांचा पॅन क्रमांक आणि 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 3: त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक टाका, त्यानंतर व्ह्यू लिंकवर आधार स्टेट्सवर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक अगोदरच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. तुमचा आधार क्रमांक अपडेट नसेल तर तुम्हाला लिकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

SMS वर चेक करा स्टेट्स

आयकर विभागाने एसएमएसच्या माध्यमातून पॅन-आधारकार्ड लिकिंग स्टेट्स चेक करण्याचा पर्याय दिला आहे. त्यासाठी करदात्यांना 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवणे आवश्यक आहे. जर दोन्ही कार्ड जोडण्यात आले असतील, तर त्याची माहिती तुम्हाला मिळेल.

एसएमएस फॉर्मेट असा असेल : UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन कार्ड क्रमांक>

पॅन-आधारची अशी करा जोडणी

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in वर जा

Quick Links या सेक्शनमध्ये Link Aadhaar हा पर्याय निवडा

तुमचे पॅन आणि आधार क्रमांक नोंदवा. Validate बटणवर क्लिक करा

आधार कार्डनुसार तुमचे नाव, मोबाईल क्रमांक नोंदवा

आता Link Aadhaar वर क्लिक करा

तुमच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपी टाका, Validate वर क्लिक करा

Non Stop LIVE Update
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.