पत्ता बदलला किंवा नाही बदलला तरी नवीन PAN 2.0 कुठे मिळेल? काय आहे पूर्ण प्रक्रिया?
केंद्र सरकारने पॅन कार्ड अपडेट करण्याची नवीन योजना आणली आहे. पॅन 2.0 अंतर्गत, पत्ता बदलणे आता सोपे झाले आहे. NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवरून आधार कार्डच्या मदतीने तुम्ही तुमचा पत्ता सहजपणे अद्यतनित करू शकता. तुमचे जुने पॅन कार्ड देखील वैध राहील. तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळेल तेव्हाच तुमच्या पत्त्याचा बदल झालेला असेल.
केंद्र सरकारने पॅनकार्ड अपडेट करण्याचा प्रकल्प मंजूर केला आहे. डीजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत हा नवीन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आता पॅनशी संबंधित अनेक प्रश्न केले जात आहेत. अनेकांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पॅनमधील पत्ता बदलण्याबाबत आणि पॅन कार्डची डिलिव्हरी करण्याशी संबंधित हे सवाल आहेत. याबाबत आयकर विभागाने माहिती दिली आहे. पॅन 2.0 मध्ये पत्ता बदलण्याशी काय नियम आहेत यावर टाकलेला हा प्रकाश.
जेव्हा पॅन 2.0 लॉन्च होणार असल्याची बातमी आली तेव्हा लोकांना काही प्रश्न पडले. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न पत्ता बदलण्याशी संबंधित होता. ज्यांनी आपला पत्ता बदलला, म्हणजे घर बदलून दुसरीकडे राहायला गेले, त्यांना नवीन पॅनकार्ड मिळेल का? नवीन पॅनकार्ड त्यांना नव्या पत्त्यावर मिळेल का? त्यावर आयकर विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. जेव्हा कार्ड धारक त्यात अपडेट करण्यासाठी अर्ज करेल तेव्हाच त्याला नवीन पॅनकार्ड दिलं जाईल. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी अर्ज केला तरच तुम्हाला क्यूआर कोडवाला नवीन पॅनकार्ड मिळेल. आणि तुमचं जुनं पॅनकार्डही व्हॅलिड राहील.
पत्ता बदलता येईल?
पॅनकार्डचा पत्ता कसा बदलायचा याचं उत्तरही आयकर विभागाने दिलं आहे. तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल किंवा त्यात काही करेक्शन करायचे असेल तर तुम्हाला ही प्रक्रिया फ्रिमध्ये करता येईल. त्यासाठी फक्त NSDL किंवा UTIISL संकेतस्थळावर जाऊन आधार मदतीने तुम्ही तुमचा पत्ता बदलू शकता किंवा त्यात सुधारणा करू शकता.
असा पत्ता बदलेल
पॅनकार्डचा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या UTIISL या संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरावा लागणार आहे. सर्व डिटेल्स भरल्यानंतर पत्ता चेंज करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करून आधार कार्डच्या मदतीने तुमचा पत्ता अपडेट करता येणार आहे.