Update | Pan Card मध्ये करायचाय बदल? घरबसल्या होईल की राव अपडेट, ही सोपी पद्धत तर समजून घ्या..

Aadhaar | आता Pan Card मध्ये सहज बदल करता येतो. तुम्ही घरीबसल्या पॅन कार्ड अपडेट करु शकता, फक्त तुमच्याकडे हे कार्ड हवं..

Update | Pan Card मध्ये करायचाय बदल? घरबसल्या होईल की राव अपडेट, ही सोपी पद्धत तर समजून घ्या..
झटपट करा पॅनकार्ड अपडेटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 2:02 PM

नवी दिल्ली : जर तुम्हाला पॅन कार्ड (Pan Card) मध्ये बदल करायचा असेल. पत्ता बदलायचा असेल. पॅन कार्ड अपडेट (Update) करायचे असेल तर आता घरबसल्या या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट हा बदल करु शकता. त्यासाठीची ही सोपी पद्धत समजून घ्या..

तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तर पॅन कार्ड अपडेट करता येते. हे प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहज पूर्ण करु शकता. आधारवर आधारीत ई-केवायसी (e-KYC) च्या माध्यमातून पत्ता अपडेट करता येतो. हे काम तुम्ही अगदी घरबसल्या करु शकता.

पॅन कार्डमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला https://www.pan.utiitsl.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. होम पेजवर खाली स्क्रॉल केल्यावर पॅन सेवांमध्ये e-KYC मोडमध्ये पत्ता अपडेट करता येईल.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर नवीन पेजवर तुम्हाला पॅन क्रमांक (PAN Number), आधार क्रमांक (Aadhar Number), मोबाइल क्रमांक (Mobile Number), ई-मेल आयडी (Email-ID) ही माहिती जमा करावी लागेल. त्यानंतर पत्ता अद्ययावत करावा लागेल. त्याठिकाणी नवीन पत्ता टाकावा लागेल. हा नवीन पत्ता बदलला (e-KYC Address Update) की कॅप्चा भरावा लागेल. डिक्लेरेशन समोरील बॉक्समध्ये क्लिक करुन अर्ज जमा करावा.

अर्ज जमा केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. याठिकाणी माहिती सत्यपित करा. पुन्हा याठिकाणी कॅप्चा भरा आणि डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करा. हा अर्ज जमा करा. त्यानंतर आधार कार्डवर नोंदणीकृत तुमच्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो सबमिट करा.

आता यानंतर नवीन पेज उघडेल. त्यावर आधार कार्डचा पत्ता दिसेल. याठिकाणी कॅप्चा भरल्यानंतर पॅन कार्डवर तोच पत्ता अपडेट करण्यासाठी सबमिट करा. त्यानंतर पॅन कार्ड अपडेट करण्याची विनंती स्वीकृत होईल. त्यानंतर एका आठवड्यात पत्ता अपडेट होईल. यानंतर तुम्ही नवीन पॅनकार्ड मागवाल तर ते नवीन पत्त्यावर पाठवण्यात येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.