पॅनकार्ड हरवल्यास काय कराल, जाणून घ्या नवं पॅनकार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया
Pan Card | कार्डच्या तपशिलात कोणताही बदल न झाल्यासच ते पुन्हा प्रिंट करता येते. ज्यांच्या पॅनवर NSDL e-Gov द्वारे नवीनतम पॅन अर्जाद्वारे प्रक्रिया केली गेली आहे किंवा प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर इन्स्टंट ई-पॅन सुविधेचा वापर करून पॅन प्राप्त झाला आहे, अशा नागरिकांनाच ही सुविधा मिळेल.
मुंबई: कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे पॅनकार्ड गहाळ झाल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे पॅन कार्ड हरवले, चोरी झाले किंवा खराब झाले, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरी बसून कार्ड पुन्हा छापण्यासाठी अर्ज करू शकता. हे ऑनलाइन केले जाऊ शकते.
काय आहेत अटी?
कार्डच्या तपशिलात कोणताही बदल न झाल्यासच ते पुन्हा प्रिंट करता येते. ज्यांच्या पॅनवर NSDL e-Gov द्वारे नवीनतम पॅन अर्जाद्वारे प्रक्रिया केली गेली आहे किंवा प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर इन्स्टंट ई-पॅन सुविधेचा वापर करून पॅन प्राप्त झाला आहे, अशा नागरिकांनाच ही सुविधा मिळेल.
या लिंकचा वापर करा
पॅन कार्ड पुन्हा छापण्यासाठी, तुम्ही https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html या लिंकवर क्लिक करू शकता. तुमचे पॅन कार्ड पुन्हा छापण्यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला पॅन नंबर, आधार क्रमांक, जन्मतारीख इत्यादी तपशील भरावा लागेल. अर्जदाराने कार्डचे पुनर्मुद्रण करण्यासाठी आधार तपशीलाचा वापर करण्यास संमती देणे आवश्यक आहे. शेवटी, फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
पुन्हा पॅनकार्ड प्रिंट करण्यासाठी किती पैसे लागतील?
पॅन कार्ड पुन्हा छापून तुमच्या घरी पोहोचवण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो ऑनलाईन भरावा लागतो. भारतात कार्ड वितरित करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. भारताबाहेरच्या पत्त्यावर कार्ड पोहोचवण्यासाठी तुम्हाला 959 रुपये द्यावे लागतील. शुल्क भरल्यानंतर, तुमचे पुनर्मुद्रित पॅन कार्ड प्राप्तिकर विभागाच्या डेटाबेसमध्ये उपलब्ध असलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल. जर तुम्ही यूटीआयआयटीएसएल वेबसाइटवर नवीनतम पॅन अर्ज केले असेल तर https://www.myutiitsl. com/PAN_ONLINE/homereprint या लिंकवर क्लिक करावे.
10 मिनिटांमध्ये इन्स्टंट पॅनकार्ड मिळणार
इन्स्टंट पॅनकार्ड ही मूळ पॅनकार्डची सॉफ्ट कॉपी समजली जाते. सरकारी कामकाजामध्ये पॅनकार्ड महत्वाचं समजलं जाते. इन्स्टंट पॅनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर ते 10 मिनिटांमध्ये मिळू शकते. तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर कॅपचा कोड टाकून आधार ओटीपी जनरेट करा तो तुमच्या मोबाईल फोनवर येईल त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करा आणि आधार डिटेल्स प्रमाणित करा.यानंतर तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करु शकता. तुम्ही पॅन कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करू शकता. यासाठी चेक स्टेटस किंवा डाऊनलोड पॅनवर तुमचा आधार नंबर नोंदवावा लागेल. याशिवाय तुमचा ई-मेल आयडी आधार क्रमांकाशी संलग्न असेल तर तुम्हाला पीडीएफ फॉर्मेट मधील पॅनकार्ड इमेल वर देखील उपलब्ध होईल.
संबंधित बातम्या:
पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
पॅनकार्ड मोफत मिळतेय अवघ्या 10 मिनिटांमध्ये, इन्कम टॅक्स विभागाच्या सेवेबद्दल जाणून घ्या
व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही