मोठी बातमी: ‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही हिरवा कंदील

Express Trains | एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेस देखील सुरू करण्यात येणार आहे.

मोठी बातमी: 'डेक्कन क्वीन'नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही हिरवा कंदील
पंचवटी एक्स्प्रेस
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 11:23 AM

नाशिक: राज्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-नाशिक प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पंचवटी एक्स्प्रेस (Panchavati Express) शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai Nashik Express Train Service resumes from 25 June)

एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेस देखील सुरू करण्यात येणार आहे.

डेक्कन क्वीन 26 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन येत्या 26 तारखेपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. महत्वाचे म्हणजे आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक होईल. व्हिस्टाडोम कोच विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तयार केले गेले आहेत. या कोचची खास अशी रचना केली गेली आहे की 180 किमी पर्यंत सहज वेग पकडू शकेल. या कोचमध्ये प्रवास करताना, प्रवासी त्यांच्या आरामदायक सीटवर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतील. वाय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित आणि मोठे स्लायडिंग दरवाजे प्रवास अधिक मनोरंजक बनवतात.

संबंधित बातम्या:

PHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद

रेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय? मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा

प्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो? अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं?

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.