नववर्षात दर महिन्याला भरा 2024 रुपयांची एसआयपी! इतक्या वर्षात पोहोचाल कोटींच्या घरात

नववर्ष 2024 सुरु झालं असून अनेकांनी आपले नवनवे संकल्प केले आहेत. भविष्याच्या दृष्टीकोनातून आर्थिक मांडणी सुरु केली आहे. अनेकांचा स्वप्न कोट्यधीश होण्याचं देखील आहे. यासाठी विविध आर्थिक योजनांची चाचपणी केली जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका संकल्पाबाबत सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीची एक आयडिया मिळेल.

नववर्षात दर महिन्याला भरा 2024 रुपयांची एसआयपी! इतक्या वर्षात पोहोचाल कोटींच्या घरात
कोट्यधीश होण्यासाठी एसआयपीचा पर्याय! 2024 रुपये महिना भरताच इतक्या वर्षांनी व्हाल मालामाल
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 6:33 PM

मुंबई : पैशांचं सोंग कोणीही करू शकत नाही, ही म्हण समाजमनात प्रचलित आहे. त्यामुळे किती चांगले कपडे घातले आणि खिशात पैसे नसतील तर त्याचा काही एक उपयोग नाही. कधी ना कधी पितळ उघडं पडतं. त्यामुळे शोबाजी करण्यापेक्षा भविष्याच्या दृष्टीने एक एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. नववर्षासाठी तुम्ही काही अर्थसंकल्प आखले असतीलच. या बातमीमुळे तुम्हाला आणखी एखादा मार्ग सापडू शकतो. जर तुम्ही दर महिन्याला 2024 रुपये गुंतवल्यास एक मोठी रक्कम जमा करू शकता. 24 वर्षात तुमची रक्कम कोट्यवधींच्या घरात पोहोचू शकते. जर तुम्ही दर महिन्याल 2024 रुपयांची एसआयपी केली तर तर तुम्हाला सरासरी 12 टक्के व्याज मिळेल. 24 वर्षात तुमची रक्कम 33,85,519 रुपयांच्या घरात पोहोचेल. स्टेअप एसआयपी करत असाल तर तुमची रक्कम 1 कोटींच्या आसपास पोहोचेल.

स्टेपअप एसआयपीणध्ये तुमची गुंतवणूक दरवर्षी 12 टक्क्याने वाढेल. म्हणजेच रक्कम एक कोटींच्या आसपास येईल. 24 वर्षानंतर 12 टक्क्यांच्या हिशेबाने ही रक्कम 90,50,840 रुपये इतकी होईल. त्यात तुम्ही 24 वर्षानंतर जमा झालेली रक्कम 6 ते 8 टक्क्यांनी वार्षिक प्लानमध्ये गुंतवली तर दररोज तुम्ही 1500 ते 2000 रुपये मिळतील. तसेच इतर ठिकाणी गुंतवणूक केली तर 6 टक्के व्याजाने तुम्हाला वार्षिक 5 लाख 43 हजार 050 रुपये मिळतील. अर्थात मासिक मिळकत 45,254 रुपये असेल. जर 8 टक्के दराने कुठे गुंतवली तर ही रक्कम आणखी वाढेल यात शंका नाही.

वरील गणित पाहून तुम्ही पाहून आश्चर्यचकीत व्हाल पण सध्याचं एसआयपीची ग्रोथ पाहता असंच आहे. महिन्याकाठी 2024 रुपये म्हणजे दिवसाला 67 रुपयांची गुंतवणूक करणं इतकं सोपं गणित आहे. अनेकदा गुंतवणूक कुठे करायची या विचारात वेळ निघून जातो आणि पैसा आहे तसाच राहतो. त्यामुळे आतापासून एखाद्या चांगल्या एसआयपीत गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम जमा होईल. तुमच्या उत्पन्नात जशी वाढ होईल तुम्ही अधिकची एसआयपीही करू शकता. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. जेणेकरून तुम्हाला तुमची गुंतवणूक योग्य ठिकाणी करता येईल. कारण एसआयपीची ग्रोथही तितकीच महत्त्वाची आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.