PayTm Visa Debit Card: पेटीएमचं नवं डेबिट कार्ड वापरा, मोठ्या डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळवा

PayTm lauch Visa Debit Card | आता नव्याने आलेल्या फिजिकल डेबिट कार्डाचा इतर बँकांच्या डेबिट किंवा एटीएम कार्डाप्रमाणे वापर करता येईल. एवढेच नव्हे तर दुकानात किंवा मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर तुम्ही हे डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे चुकते करु शकता.

PayTm Visa Debit Card: पेटीएमचं नवं डेबिट कार्ड वापरा, मोठ्या डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळवा
पेटीएम डेबिट कार्ड
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 12:21 PM

मुंबई: पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने नुकतेच एक डेबिट कार्ड लाँच केले आहे. यापूर्वी PayTm ने व्हर्च्युअल डेबिट कार्ड बाजारात आणले होते. मात्र, यावेळी PayTm ने फिजिकल डेबिट कार्ड लाँच केले आहे. आतापर्यंत PayTmने तब्बल 45 लाख व्हर्च्युअल डेबिट कार्डस वितरीत केल्याचे समजते. (PayTm lauch Visa Debit Card)

आता नव्याने आलेल्या फिजिकल डेबिट कार्डाचा इतर बँकांच्या डेबिट किंवा एटीएम कार्डाप्रमाणे वापर करता येईल. एवढेच नव्हे तर दुकानात किंवा मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर तुम्ही हे डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे चुकते करु शकता.

PayTm Visa Debit Card कशाप्रकारे मिळवाल?

तुम्ही PayTm App चा वापर करून या कार्डासाठी अप्लाय करु शकता. PayTm App वरील बँक सेक्शनमध्ये जाऊन त्याठिकाणी असलेला Manage Card हा पर्याय निवडावा. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला Upgrade to Visa Debit Card हा ऑप्शन दिसेल. तुमच्याकडे व्हर्च्युअल कार्ड असेल तर तर तुम्ही ते कार्ड अपग्रेड करु शकता.

पेटीएम डेबिट कार्डाचे फायदे?

PayTm Visa Debit कार्डावर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. परदेशात गेल्यानंतरही तुम्ही हे कार्ड वापरु शकता. त्यावर घसघशीत डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळू शकते. याशिवाय, कॉन्टॅक्टलेस पेमेंट, एटीएम स्वाईप सुविधा आणि ऑनलाईन खरेदी अशा सुविधाही उपलब्ध आहेत.

आतापर्यंत PayTmने तब्बल 45 लाख व्हर्च्युअल डेबिट कार्डस वितरीत केली आहेत. त्यानंतर 2021-22 या आर्थिक वर्षात 10 लाख फिजिकल डेबिट कार्डस वितरीत करण्याचा PayTm चा मानस आहे.

संबंधित बातम्या:

‘या’ बँकेत तुमचे खाते आहे का? 1 जुलैपासून IFSC कोड बदलणार, जुनं चेकबुक रद्द होणार

तुम्ही तुमच्या PF खाते आणि UAN ची माहिती नाहीये? मग ‘या’ ऑनलाईन टीप्सचा वापर करा

जुलै महिन्यात सरकारी आणि खासगी बँक 15 दिवस बंद राहणार, कामांचं नियोजन करण्यासाठी वाचा सुट्ट्यांची यादी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.