AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवन प्रमाणपत्र अवघ्या काही क्लिकवर ! पेन्शनसाठी ऑनलाईन सादर करा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट

Jeevan Pramaan Patra जमा केल्याने निवृत्तीवेतनधारक अजूनही जिवंत असल्याची खात्री पटते. या आधारावर निवृत्ती वेतन (Pension) दिले जाते. या प्रकियेनंतर पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करावा लागत नाही

जीवन प्रमाणपत्र अवघ्या काही क्लिकवर ! पेन्शनसाठी ऑनलाईन सादर करा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट
जीवन प्रमाणपत्र अवघ्या काही क्लिकवर Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 12:25 PM

Digital life certificate : निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी निवृत्ती (Pension) वितरण प्राधिकरणाकडे जीवन प्रमाणपत्र (Jeevan Pramaan Patra)सादर करावे लागते. मात्र, आता जीवन प्रमाण सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital life certificate) ऑनलाइन सादर करता येणार आहेत. केंद्र किंवा राज्य सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी ही बायोमेट्रिक (Biomatric)-सक्षम डिजिटल सेवा आहे. त्यासाठी पेन्शन खात्याची आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. मात्र, मोबाइल क्रमांक आधारशी लिंक (Aadhar Card Link) करण्याची गरज नाही. निवृत्तीवेतनधारकाला जीवनाच्या पुराव्यासाठी पेन्शन वितरण अधिकाऱ्यासमोर व्यक्तिशः हजर राहण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन प्रमाणपत्र जमा केल्याने निवृत्तीवेतनधारक अजूनही जिवंत असल्याची खात्री पटते. या आधारावर निवृत्ती वेतन (Pension) दिले जाते. या प्रकियेनंतर पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करावा लागत नाही.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) लाइफ प्रूफ सेंटर जसे की बँका, सरकारी कार्यालये, पोस्ट कार्यालये किंवा लाइफ प्रूफ अ ॅप्स (Jeevan Pramaan app) पासून मिळू शकते. https://jeevanpramaan.gov.in/ अॅप डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी मंजूर बायोमेट्रिक फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनिंग डिव्हाइस आवश्यक आहे.

एक वेळ प्रक्रिया जर तुम्ही मोबाईल अॅपचा वापर केलात तर निवृत्तीधारका व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती त्यांची माहिती जसे आधार आणि मोबाईल नंबर आणि त्यानंतर पेन्शनरची माहिती टाकू शकते. ऑथेंटिकेशनसाठी ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जातो. ओटीपी व्हेरिफिकेशननंतर या अॅपचा वापर डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

ऑनलाइन सबमिट करा लाइफ प्रूफ वेबसाइट https://jeevanpramaan.gov.in/ वेबसाइटद्वारे किंवा अ ॅपद्वारे जीवन प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने सादर केली जाऊ शकतात. त्यासाठी स्वत:ची नोंदणी करावी लागेल. सर्वात आधी लाईफ प्रूफ मोबाईल अॅप डाऊनलोड करा. येथे अर्जदाराला आपला आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर किंवा पीपीओ, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि मोबाइल क्रमांक याची माहिती सादर करावी लागेल.

पोर्टल बायोमेट्रिक पडताळणीसाठी आधार प्लॅटफॉर्मचा वापर करते आणि अर्जदाराला ओळख पटविण्यासाठी त्याचे / तिचे बोटांचे ठसे सादर करावे लागतात. येथे पडताळणी केल्यानंतर जीवन प्रमाण पोर्टल नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवेल, ज्यात लाइफ सर्टिफिकेट आयडी असेल . त्यानंतर, आयडी सबमिट करून जीवन प्रमाणपत्र मिळवता येईल. जीवन प्रमाणपत्राच्या आधारेच पेन्शन दिली जाते.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.