ICICI Prudential Life: उतारवयातील जादूचा दिवा; कमाई हमखास, जगा जीवन बिनधास्त

उतारवयातील गरजा सामोरे ठेऊन ही खास निवृत्तीची योजना बाजारात उपलब्ध आहे. तुमचे राहणीमान आणि औषधींचा खर्चाचा भार मुलावर पडणार नाही याची काळजी हा प्लॅन घेतो. तो तुम्हाला हमखास परतावा देतो.

ICICI Prudential Life: उतारवयातील जादूचा दिवा; कमाई हमखास, जगा जीवन बिनधास्त
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 9:41 AM

उतारवयातील संध्याकाळ पैशांच्या चणचणीत घालविण्यापेक्षा बिनधास्त जगण्यासाठी काही खास गुंतवणुकी आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यात करणे गरजेचे असते. तसे केले तर उतारवयातील संध्याकाळ मजेत आणि बिनधास्त जगता येते. आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्स कंपनीने (Insurance Company) आयसीआयसीआय प्रु गारंटीड पेन्शन प्लॉन फ्लेक्सी (ICICI Pru Guaranteed Pension Plan Flexi) बाजारात उतरवला आहे. नियमीत प्रिमियम असणारे हे कंपनीचे वार्षिक उत्पादन(Annuity Plan) आहे. जे ग्राहकांना एका मोठ्या कालावधीसाठी पद्धतशीर आणि नियमीत बचत करण्यास मदत करते आणि निवृत्तीनंतर उर्वरीत आयुष्य मजेत घालवण्यास मदत करते.

आयसीआयसीआय प्रु लाईफच्या दाव्यानुसार बचतीसाठी (Savings) नियमीत योगदान करण्यासाठी आणि निवृत्तीनंतर (Retirement) त्याची गोड फळे चाखून उर्वरीत आयुष्य सुखनैन घालण्यासाठीचे हमखास उत्पादन (Guaranteed Pension Plan) आहे. कंपनीने त्यांच्या या उत्पादनाची छातीठोकपणे हमी घेतली आहे. त्यांचा हा दावा कितपण खरा आहे हे बाजारातील विश्लेषक आणि अभ्यासक चांगल्यारित्या सांगू शकतील. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तुम्ही त्याचा पडताळा करणे आवश्यक आहे.

ग्राहकांच्या गरजांनुसार, आयसीआयसीआय प्रु गारंटीड प्लॅन फ्लेक्सी सात संवर्गात उपलब्ध आहे. यातील एक सर्वसाधारण योजना म्हणजे एक्सिलेरेटेड हेल्थ बुस्टर सोबत लाईफ एन्युटी आणि बुस्टर पेआऊट – लाईफ एन्युटी ही योजना. या योजना त्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आल्या आहेत. जे वार्षिकी उत्पादनाच्या शोधात आहेत. या योजनेत ग्राहकांना आरोग्यासह दर्जेदार जीवन जगण्यासाठी अतिरिक्त रक्कमेसह नियमीत परताव्याची हमी देते. Accelerated Health Booster पर्याय हा ग्राहकांना अतिरिक्त रक्कम देतो. आरोग्यविषयक खर्चाची पुर्तता करण्यासाठी ही खास योजना आहे. बुस्टर पेआऊट पर्याय व्यक्तिंना त्यांच्या वार्षिक परताव्यासोबतच पाच एकरक्कमी सुविधा देते. या योजना ग्राहकांना त्यांच्या निवृत्तीसाठीची तयारी आणि निवृत्तीनंतर रककम हातात येण्यासाठी मदत करते.

काय आहे योजनेचे वैशिष्टये

आयसीआयसीआय प्रु गॅरटींड पेंशन प्लॅन फ्लेक्सी ज्वाईंट लाईफ एन्युटी पर्याय प्रिमियम फायदासह सवलत देणारा आहे. प्रिमियम अदा करण्यासाठीच्या कालावधीत पहिल्या भागधारकाच्या मृत्यूसंबंधी ही योजना कार्यपयोगी ठरेल. अकाली मृत्यूच्या स्थितीत, भविष्यातील सर्व प्रिमियमला माफ करण्यात येते. त्याचवेळी दुस-या सहभागीदारीला योजनेच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उर्वरीत आयुष्यासाठी नियमीत परतावा देण्याची हमी ही योजना देते. दुसरा सहभागीदार इहलोक सोडून गेला तर त्यांच्या वारसाला एकूण गुंतवणुकीची रक्कम देण्यात येते. अत्यंत जटील रोग जडलेले असताना, अपंगत्व आलेले असताना, उत्पादन प्रिमियम परताव्यासंदर्भात पॉलिसी परत करण्याची, सरेंडर करण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. ही योजना ग्राहकाला आरोग्य उपचारांकरीता रक्कमेचा उपयोग करण्यास मुभा देते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.