Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्सनल लोन घेतलंय, हप्ते थकलेत? बँकेकडून कशी होते कारवाई? वाचा नियम

तुम्ही बँकेकडून कधी पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेतले आहे का? पर्सनल लोन थकवले तर त्यावर बँकेकडून काय कारवाई केली जाते, याचे नेमके नियम काय आहेत? याची माहिती विस्ताराने पाहू

पर्सनल लोन घेतलंय, हप्ते थकलेत? बँकेकडून कशी होते कारवाई? वाचा नियम
पर्सनल लोन
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 12:27 PM

आपण अनेकदा गरज पडली की बँकेकडून पर्सनल लोन घेतो. पण, पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जाचे हप्ते थकले तर बँकेकडून काय कारवाई केली जाते, याचे नेमके नियम काय आहेत. याच विषयी आम्ही आज तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. पर्सनल लोनविषयी खाली विस्ताराने जाणून घेऊया.

अनेकदा पैशांची गरज असली की ग्राहक बँकेकडून पर्सनल लोन घेतात. पण, काही काळ या पर्सनल लोनचे हप्ते फेडले आणि त्यानंतर काही कारणांमुळे तुम्ही पर्सनल लोनचे हप्ते फेडू शकले नाही तर, अशा परिस्थितीत बँक काय करणार? आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत, जर एखादी व्यक्ती बँकेकडून घेतलेल्या पर्सनल लोनची परतफेड करू शकत नसेल तर बँकेकडून काय कारवाई केली जाते, याचे उत्तर चला जाणून घेऊया.

भारतात बँकेचे कर्ज न फेडल्यास अनेक कायदेशीर नियम करण्यात आले आहेत. जर एखादी व्यक्ती बँकेचे कर्ज फेडू शकत नसेल तर त्याच्यावर अनेक कायदेशीर कारवाई केली जाते. हा अगदी साधा नियम आणि तुम्हाला माहिती असलेली गोष्ट आहे. पण, याशिवाय देखील कायदे आहे, त्यानुसार तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते, याविषयी जाणून घेऊया.

कर्जाची परतफेड न केल्यास मालमत्तेवर जप्ती?

भारतात तुम्ही पर्सनल लोन फेडू शकत नसाल तर बँक तुमच्याविरोधात दिवाणी न्यायालयात दिवाणी खटला दाखल करू शकते. यासोबतच तुमची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते. यासोबतच तुमचा पगारही जप्त केला जाऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी बँकेचे कर्ज फेडावे लागते. इतकंच नाही तर पर्सनल लोन फेडू न शकल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळणं खूप कठीण होऊन बसतं.

बँकेचे कर्ज न फेडल्यास अनेक कायदेशीर नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे गरज असेल तर हे कर्ज घ्या. कारण, उगाच यामुळे तुमचे आर्थिक नुकसान मोठ्या प्राणात होऊ शकते. एखादी व्यक्ती बँकेचे कर्ज फेडू शकत नसेल तर त्याच्यावर अनेक कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे आधीच सतर्क व्हा आणि गरज असेल तर हे कर्ज घ्या. कारण, याचा व्याजदर देखील अधिक असतो.

कर्ज बुडविणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा

अशा परिस्थितीत कर्ज बुडविणाऱ्यावर तुरुंगवासासह भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये गुन्हा ही दाखल केला जाऊ शकतो. कर्जाची परतफेड न झाल्यास बँका अनेक कर्ज वसुली एजन्सींचा देखील आधार घेतात. तुमच्यासोबत छळही होऊ शकतो.

सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'.
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्...
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्....
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप.
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार.
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका.
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'.
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले.