Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Petrol and Diesel | दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 8:43 AM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या डिझेलच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. आगामी काळात कच्च्या तेलाचे भाव वधारण्याची शक्यता आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सहन करत राहणार, हेदेखील पहावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

पेट्रोलियम जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.95 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 97.84रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.89 आणि 90.17  रुपये इतका आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येत्या काही दिवसांत भारतात मोठी इंधन दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीने 2018 नंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 80 डॉलर्स इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करणे अटळ मानले जात आहे.

जगभरात लॉकडाऊनचे निर्बंध हटल्यानंतर अनेक देशांमध्ये दैनंदिन व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे वाहने पुन्हा मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे इंधनाच्या पर्यायाने कच्च्या तेलाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही काळात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी झाल्याने सध्या बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वरच्या दिशेने प्रवास करत आहेत.

गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरीस ब्रेंट क्रूडची किंमत $ 90 ला स्पर्श करू शकते. जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा जोर ओसरल्यानंतर दैनंदिन व्यवहारांना वेग आला आहे. त्यामुळे तेलाची मागणी झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत नुकत्याच आलेल्या चक्रीवादळ इडाच्या विनाशामुळे तेलाच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनानंतर कच्च्या तेलाच्या मागणीत इतक्या झपाट्याने वाढ होईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. आगामी काळात कच्च्या तेलाचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव चढेच राहतील, असा अंदाज आहे.

इतर बातम्या:

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

(Petrol and Diesel rates in India)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.