नोकरी सोडताना ‘हा’ फॉर्म भराच, अन्यथा तुमचे पैसे मिळवताना नाकीनऊ येईल
EPFO ने मध्यंतरी आपले पॅनकार्ड पीएफ खात्याशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. | EPFO Provident Fund
मुंबई: नोकरदार व्यक्तींसाठी भविष्य निर्वाह निधीचे (Provident Fund) खाते अत्यंत महत्वाचे असते. भविष्यातील तरतूद म्हणून नोकदार व्यक्ती याकडे पाहतात. त्यामुळे नोकरी करताना आपल्या PF अकाऊंटशी संबंधित काही गोष्टींचे तुम्हाला ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असते. (How fo fill pf account exit form when you quit a company)
तुम्ही एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल आणि तुम्ही ती नोकरी सोडली तर वेळोवेळी Provident Fund अकाऊंट अपडेट ठेवणे गरजेचे असते. तुम्ही नोकरी सोडताना Provident Fund अकाऊंट अपडेट नाही केले तर भविष्यात तुम्हाला पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नोकरी सोडताना एक्झिट फॉर्म भरतेवेळी Provident Fund अकाऊंटशी संबंधित काही गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जुनी नोकरी सोडल्याची नेमकी तारीख माहिती नसेल तर Provident Fund ट्रान्सफर करणे किंवा पैसे काढणे अडचणीचे ठरु शकते. मात्र, EPFO ने या प्रणालीत बरेच बदल केले आहेत. आता यूएएन नंबरच्या मदतीने तुम्ही आपले अकाऊंट मर्ज करु शकता किंवा नोकरी सोडल्याची तारीख अपडेट करु शकता.
डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्यासाठी काय कराल?
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या वेबसाईटवर जाऊन यूएएन (UAN no) आणि पासवर्ड संबंधी माहिती भरा. त्यानंतर मॅनेज टॅबमध्ये जाऊन मार्क एक्झिट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर सिलेक्ट एम्प्लॉयमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करुन यूएन क्रमांकाशी संबंधित पीएफ अकाऊंटची निवड करावी. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंपनीची माहिती दिसेल. त्यामध्ये डेट ऑफ एक्झिट भरुन सबमिट करावे. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनसाठी ओटीपी मिळेल.
आणखी काय करावे लागेल?
EPFO ने मध्यंतरी आपले पॅनकार्ड पीएफ खात्याशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अन्यथा पीएफचे पैसे काढताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पीएफ काढतेवेळी टीडीएस कापला जातो.
संबंधित बातम्या:
आता घर बसल्या PF अकाऊंट ऑनलाईन करा ट्रान्सफर, EPFO ने सांगितली संपूर्ण प्रोसेस
UAN नंबर माहीत नाही, घाबरू नका, अशा पद्धतीनं काढता येणार पीएफ खात्यातून पैसे
PF Account मध्ये अशी अपडेट करा बँकेची माहिती; फक्त तीन टप्पे आणि काम फत्ते
(How fo fill pf account exit form when you quit a company)