घर घेण्यासाठी PF मधून पैसे काढता येतात? जाणून घ्या

तुम्हाला नवं घर खरेदी करायचं आहे का? पैसे कमी पडताय का? मग चिंता करू नका. तुमच्याकडे एक पर्याय शिल्लक आहे. तुम्ही PF च्या खात्यातून घर खरेदीसाठी पैसे काढू शकतात. PF खातेधारक घर खरेदी, घर बांधणे किंवा दुरुस्तीसाठी अंशत: पैसे काढू शकतो. पण त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. जाणून घ्या.

घर घेण्यासाठी PF मधून पैसे काढता येतात? जाणून घ्या
घर खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडताहेत का ?
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 3:40 PM

घर खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडताहेत का ? मग चिंता का करताय. आम्ही तुम्हाला त्यावर एक चांगला पर्याय सांगणार आहोत. या पर्यायामुळे तुमचं देखील हक्काचं घर होऊ शकतं. तुम्ही PF च्या खात्यातून घर खरेदीसाठी पैसे काढू शकतात. ते कसं शक्य आहे, याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

प्रॉव्हिडंट फंड (PF) तुमच्या कामी येऊ शकतो. PF खातेदारांना त्यांच्या खात्यात जमा रकमेचा काही भाग काढण्याची सुविधा दिली जाते. यामुळे तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. PF मधून पैसे काढण्यासाठी कोणत्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे आणि किती पैसे काढता येतील हे समजून घेऊया.

PF मधून घर खरेदीसाठी पैसे कसे काढावे?

EPFO च्या नियमांनुसार PF खातेधारक घर खरेदी, घर बांधणे किंवा दुरुस्तीसाठी अंशत: पैसे काढू शकतात. पण त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

घर खरेदीसाठी PF चे नियम काय? PF मधून पैसे काढण्यासाठी तुम्ही EPFO चे सदस्य म्हणून किमान 5 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

प्लॉट किंवा घर खरेदी करत असाल तर मासिक पगाराच्या 24 पट (DA सह) किंवा खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेच्या कमी, जे काही असेल ते काढू शकता.

ही मर्यादा घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी मासिक वेतनाच्या 36 पट असू शकते.

मासिक वेतनाच्या 12 पट रक्कम काढता येते.

या सुविधेच्या अटी काय?

तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल आणि सलग 5 वर्षे EPF खात्यात योगदान देत असाल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. हे लक्षात ठेवा की, ही रक्कम घर खरेदी करणे, घर बांधणे किंवा त्याची दुरुस्ती करणे, यासाठी दिली जाऊ शकते, हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे.

पैसे काढण्यासाठी अर्ज कसा करावा?

EPFO मधून पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. EPFO च्या अधिकृत वेबसाईट किंवा उमंग ॲपद्वारे फॉर्म -31 भरू शकता. अर्ज करताना तुम्हाला मालमत्तेच्या खरेदी-बांधकामाचा पुरावा, जसे कराराची प्रत किंवा बिल्डरशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील.

EP मधून पैसे काढण्याचे फायदे कोणते?

EPमधून काढलेले पैसे व्याजमुक्त असतात स्वत:च्या जमा झालेल्या पैशांचा योग्य वापर करण्याची संधी कोणत्याही गॅरंटर किंवा सिक्युरिटीची गरज नसते.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.