PF Withdrawal : EPFO सदस्यांना मोठा दिलासा! पीएफ काढला तरी नाही द्यावा लागणार जास्त टीडीएस

PF Withdrawal : EPFO सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना पीएफ खात्यातून रक्कम काढताना आता पूर्वीप्रमाणे कमी टीडीएस कपात होईल.

PF Withdrawal : EPFO सदस्यांना मोठा दिलासा! पीएफ काढला तरी नाही द्यावा लागणार जास्त टीडीएस
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 6:31 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी एक महत्वाची घोषणा केली होती. अर्थसंकल्पात ईपीएफओ सदस्यांना (EPFO Members) मोठा दिलासा दिला होता. ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही, त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात दिलासा घोषीत करण्यात आला होता. तसेच ज्याचे रेकॉर्ड अपडेट नाही अशा सदस्यांसाठी केंद्र सरकारने खूशखबर दिली होती. त्यानुसार, यापूर्वी अशा सदस्यांनी त्यांच्या पीएफ खात्यातून रक्कम काढल्यास त्यांना 30 टक्के टीडीएस भरावा लागत होता. हा नियम पाच वर्षांच्या आत पीएफ खात्यातून रक्कम काढल्यास लागू होता. हा नियम आजही लागू आहे. पण यातील टीडीएसची (TDS) रक्कम कमी करण्यात आली आहे. त्याचा सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे नियम

सध्याच्या आयकर खात्याच्या नियमानुसार, पीएफ खाते उघडल्यानंतर पाच वर्षांत त्यातून रक्कम काढल्यास टीडीएस कपात होते. ईपीएफ रक्कम काढल्यास ईपीएफओ टीडीएस कपात करते. पाच वर्षांच्या आत सदस्याने रक्कम काढल्यास आणि त्याचे पॅन कार्ड व इतर माहिती अद्ययावत असल्यास 10 टक्क्यांपर्यंत टीडीएस कपात करण्यात येते. पण जर तुमच्याकडे पॅनकार्ड उपलब्ध नसेल आणि माहिती अद्ययावत नसेल तर अशा परिस्थितीत 30 टक्के टीडीएस कपात करण्यात येत होता.

हे सुद्धा वाचा

काय झाला बदल

पॅन कार्ड व इतर माहिती अद्ययावत नसल्यास सदस्याला यापूर्वी 30 टक्के टीडीएस द्यावा लागत होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात टीडीएसची रक्कम कमी केली. त्यांनी टीडीएसचा दर कमी केला. हा दर आता 20 टक्क्यांवर आला आहे. म्हणजे, पाच वर्षांत सदस्याने, ज्याच्याकडे पॅनकार्ड नाही आणि त्याची माहिती अपडेट नाही, रक्कम काढल्यास, त्याला 20 टक्के टीडीएस द्यावा लागेल.

का घेतला हा निर्णय

अर्थसंकल्प 2023 मध्ये टीडीएस कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक पगारदारांना कमी पगार आहे आणि त्यांना पैशांची नड पडल्यावर ते ईपीएफमधील रक्कम काढतात. त्यावेळी त्यांना टीडीएसमध्ये मोठी रक्कम खर्च करावी लागते. त्यासाठी त्यांना हा दिलासा देण्यात आला. आयकर कायद्याच्या 192ए नियमानुसार हा बदल करण्यात आला तर याच कायद्याचा दुसरा नियम रद्द करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे पॅन कार्ड नसल्यास 20 टक्के टीडीएस कपात होईल.

ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी यासाठी सदस्यांना एक अर्ज भरुन द्यावा लागतो. खातेदाराला फॉर्म 15एच किंवा फॉर्म 15जी ई अंतर्गत ही सुविधा मिळते. फॉर्म 15G 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी तर 15H हा फॉर्म 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. EPFO द्वारे TDS कापल्यानंतर, करदात्याला TDS प्रमाणपत्र दिल्या जाते. रिफंड मिळवण्यासाठी तुम्ही आयकर रिटर्न (ITR) भरताना TDS प्रमाणपत्र सादर करू शकता.

EPFO ​​members, in this case, more TDS will have to be paid even if PF is withdrawn, know what is the new rule

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.