Gold Investment : फिजिकल की डिजिटल, गुंतवणूक कुठे राहिल ‘अक्षय’! हा आहे फायद्याचा सौदा

Gold Investment : देशात सराफा बाजारात थेट सोने खरेदी करण्यासोबतच आता डिजिटल सोने खरेदीच्या योजना पण लोकप्रिय होत आहे. फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्डपैकी कोणतेही राहिल तुमच्या फायद्याचे

Gold Investment : फिजिकल की डिजिटल, गुंतवणूक कुठे राहिल 'अक्षय'! हा आहे फायद्याचा सौदा
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 5:23 PM

नवी दिल्ली : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानण्यात येते. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्यास घरात सुख शांती येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे गरिबातील गरिब माणूसही या दिवशी काही ग्रॅम का असेना सोने खरेदी (Gold Buy) करतो. अक्षय तृतीयेला आता काही तास उरले आहेत. 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. त्यामुळे खरेदीदारांना, गुंतवणूकदारांना आता केवळ फिजिकलच नाही तर, डिजिटील, ईटीएफ गोल्ड, म्युच्युअल फंड सारखे अनेक पर्याय (Gold Investment) उपलब्ध आहेत.

Physical Gold Vs Digital Gold देशातील पारंपारिक गुंतवणूकदार, खरेदीदार सराफा बाजारात जाऊन सोने खरेदी, फिजिकल गोल्ड खरेदीला पसंती देतात. अनेक ग्राहकांना डिजिटल गोल्डची माहिती नाही, अथवा त्यांना हा पर्याय विश्वसनीय वाटत नाही. सध्याच्या काळात सोन्यात गुंतवणुकीसाठी सॉव्हेरिन गोल्ड बाँड (Sovereign gold bonds) आणि गोल्ड ईटीएफ (Gold ETF) सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याच्या दागिन्यापेक्षा डिजिटल गोल्डमध्ये अधिक परतावा मिळण्याची दाट शक्यता असते.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचा पर्याय डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सॉव्हेरिन गोल्ड बाँड हा चांगला पर्याय आहे. हा एक प्रकारचा पेपर गोल्ड वा डिजिटल गोल्ड आहे. यामध्ये ग्राहकाला सोने खरेदीचे, गुंतवणुकीचे प्रमाणपत्र मिळते. त्यावर त्यावेळचा भाव नोंदवलेला असतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये सॉव्हेरिन गोल्ड बाँड योजना सुरु केली होती. यामध्ये ग्राहकाला 1 ग्रॅम सोने खरेदी करता येते. यामध्ये गुंतवणुकीवर फायदा तर होतोच, पण दरवर्षी 2.5 टक्के व्याज ही मिळते.

हे सुद्धा वाचा

सुवर्णरोख्याचा फायदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.

Gold ETF तुम्ही शेअर खरेदी करता, तसे सोने खरेदी करु शकाल, या सुविधेला Gold ETF असे म्हणतात. हा एक्सचेंज-ट्रेडेड फंड असतो. हा स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विक्री करता येतो. सोन्याच्या सध्याच्या किंमतीच्या जवळपास गोल्ड ईटीएफ खरेदी करता येते. गोल्ड ईटीएफचे बेंचमार्क स्पॉट भाव आहे. पण यासाठी तुमच्याकडे ट्रेंडिंग डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही गोल्ड ईटीएफ खरेदी करु शकता.

डिजिटल सोने डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स डिजिटल सोन्याचा पर्याय देत आहेत. ज्यांना सोन्यात 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा योग्य पर्याय आहे. यामध्ये ग्राहकांना आवडीनुसार खरेदी-विक्री करण्याची सोय आहे. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला सोने खरेदी-विक्रीची सुविधा मिळते. गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून हे सोने खरेदी करता येते.

फायदा तरी काय

  1. प्रत्यक्ष सोने खरेदी करताना आपल्याला त्यावर कर चुकता करावा लागतो. परंतु डिजिटल गोल्ड खरेदीवर जीएसटी आकारण्यात येत नाही. अजुन गोल्ड इन सिक्युरिटीवर जीएसटी लावण्याचा नियम नाही. त्यामुळे ग्राहकांना जवळपास 3 टक्क्यांचा फायदा होतो.
  2. डिजिटल गोल्ड जवळ बाळगण्याची गरज नाही. ते हरविण्याची भीती नाही. तसेच ते लॉकरमध्ये ठेऊन, त्यापोटी बँकेला पैसे मोजण्याची गरज नाही. चोरी होण्याची भीती नाही.
  3. डिजिटल गोल्ड केव्हा पण खरेदी आणि विक्री करता येते. तर फिजिकल गोल्ड विक्रीसाठी तुम्हाला सराफा पेढीवर, दुकानावर जावे लागते. दुकानदार सोने कमी किंमतीवर खरेदी करतो.
  4. फिजिकल गोल्ड खरेदी करताना त्याची शुद्धता काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. पण डिजिटल गोल्ड खरेदी करताना शुद्धतेची तपासणी करावी लागत नाही. तसेच डिजिटल गोल्डची डिलिव्हरी नेहमी 24 कॅरेट सोन्यातच करण्यात येते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....