काय आहे International Bullion exchange, भारतातील सोन्याच्या व्यापारात आमुलाग्र बदल होणार?
Gold Rates | आगामी काळात हे एक्स्चेंज भारतातील सोन्याच्या आयातीचे मुख्य केंद्र ठरेल. भारतातील सोन्याची सर्व आयात याच International Bullion exchange मधून पार पडेल. हे एक्स्चेंज पूर्णपणए कार्यरत झाल्यानंतर सोन्याचे भाव योग्यरित्या ठरवले जातील
मुंबई: आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र नियामक संस्थेकडून बुधवारी भारतात International Bullion exchange लाँच करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात International Bullion exchange मधील व्यवहार प्रायोगिक तत्त्वावर होतील. मोदी सरकारने 2020 साली सादर केलेल्या अर्थसंकल्पात आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंजची संकल्पना मांडली होती.
आगामी काळात हे एक्स्चेंज भारतातील सोन्याच्या आयातीचे मुख्य केंद्र ठरेल. भारतातील सोन्याची सर्व आयात याच International Bullion exchange मधून पार पडेल. हे एक्स्चेंज पूर्णपणए कार्यरत झाल्यानंतर सोन्याचे भाव योग्यरित्या ठरवले जातील, अशी आशा आहे. सध्या भारतात वेगवेगळ्या मार्गांनी सोने आयात होते. मात्र, आता एकाच केंद्राच्या माध्यमातून सोने आयात झाल्यास आयातीमध्ये फायदा मिळेल. यामुळे दुबईतील सोने व्यापाऱ्याचा एक मोठा हिस्सा भारताकडे वळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सध्याच्या घडीला लंडन, तुर्की आणि शांघायमध्ये अशाप्रकारचे एक्स्चेंज आहेत.
शेअर्सप्रमाणे सोन्याचं ट्रेडिंग
गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.
पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?
आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?