शेतकऱ्यांना आता विनातारण 1.60 लाखांचे कर्ज मिळणार, जाणून घ्या सर्वकाही

Farmers | बँकर्स समितीने सरकारला आश्वासन दिले आहे की सर्व पात्र अर्जदारांना पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळेल. राज्यात सुमारे 16 लाख कुटुंबांकडे दुभती जनावरे असून त्यांचे टॅगिंग करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आता विनातारण 1.60 लाखांचे कर्ज मिळणार, जाणून घ्या सर्वकाही
शेतकरी
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 11:48 AM

नवी दिल्ली: तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हरियाणात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. पशु किसान क्रेडिट कार्डच्या अटी मोदी सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेसारख्याच आहेत. या अंतर्गत गाय, म्हैस, मेंढ्या, शेळी आणि कोंबड्या पाळण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उपलब्ध होणार आहे. यामध्ये 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेण्यासाठी कोणतीही हमी द्यावी लागणार नाही.

बँकर्स समितीने सरकारला आश्वासन दिले आहे की सर्व पात्र अर्जदारांना पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळेल. राज्यात सुमारे 16 लाख कुटुंबांकडे दुभती जनावरे असून त्यांचे टॅगिंग करण्यात येत आहे.

गायी-म्हशींच्या खरेदीसाठी किती पैसे मिळतील?

* गायीसाठी 40,783 रुपये देण्याची तरतूद आहे. * म्हशीसाठी ६०,२४९ रु. हे प्रति म्हशी असेल. * मेंढ्या आणि शेळ्यांसाठी 4063 रु. * कोंबडी खरेदी करण्यासाठी (अंडी देणाऱ्या) 720 रुपये कर्ज दिले जाईल.

पशु किसान क्रेडिट कार्डासाठी कोण पात्र?

* अर्जदार हरियाणा राज्याचा कायमचा रहिवासी असावा. * अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र. * मोबाईल नंबर. * पासपोर्ट साइज फोटो.

कर्जाचा व्याजदर?

* साधारणपणे ७ टक्के व्याजदराने बँका कर्ज उपलब्ध करून देतात. * पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांना फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागेल. * केंद्र सरकारकडून तीन टक्के सूट देण्याची तरतूद आहे. * कर्जाची रक्कम कमाल रु.3 लाखांपर्यंत असेल.

पशु किसान क्रेडिट कार्डासाठी अर्ज कसा कराल?

हरियाणा राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेंतर्गत पशु क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे, त्यांना त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्‍यासाठी तुमच्‍या सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह बँकेत जावे लागेल. तिथे तुम्हाला अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला केवायसी करावे लागेल. केवायसीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावे लागेल. पशुधन क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी बँकेकडून केवायसी आणि अर्जाची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला 1 महिन्याच्या आत कर्ज मिळेल.

संबंधित बातम्या:

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

अनियमितता टाळण्यासाठी पीएम किसान योजनेत अणखीन बदल, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात, संघर्ष दिंडीनंतर आता महामुक्काम

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.