PM Modi यांनी लाँच केले Call Before u Dig अ‍ॅप! ना पाइपलाइन तुटेल.. ना केबल कनेक्शन हलणार, वर्षाचे 3 हजार कोटी वाचणार?

Call Before u Dig App | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात नवे मोबाइल अ‍ॅप लाँच केले. हे अ‍ॅप नेमक काय काम करतं ते पाहुयात-

PM Modi यांनी लाँच केले Call Before u Dig अ‍ॅप! ना पाइपलाइन तुटेल.. ना केबल कनेक्शन हलणार, वर्षाचे 3 हजार कोटी वाचणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 4:31 PM

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात भारताच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर महत्त्वाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात Call Before U Dig हे मोबाइल अ‍ॅपदेखील लाँच केलंय. मोदींनी लाँच केलेलं हे अ‍ॅप तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

काय आहे Call Before U Dig अ‍ॅप?

CBuD म्हणजेच Call Before U Dig हे एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाचा हा एक मोठा उपक्रम आहे. एखाद्या ठिकाणी काही विकास कामासाठी खोदकाम सुरु असेल तर जमीन खोदण्यापूर्वी त्या ठिकाणी खाली एखादे वीजेचे वायर किंवा टेलिकॉम कंपनीचे वायर किंवा एखादी पाइपलाइन गेलेली असेल, याविषयी हे अ‍ॅप माहिती देईल. आतापर्यंत खोदकाम करताना या गोष्टींचा थांगपत्ता लागणे कठीण होते. त्यामुळे जमिनीखालील केबल किंवा पाइपलाइन अनेकदा तुटण्याची किंवा फुटण्याच्या घटना घडत असत.

गतिशक्ती संचार पोर्टलनुसार, CBuD मोबाइल अ‍ॅपद्वारे जे लोक खोदकाम करत असतील किंवा जी कंपनी खोदकाम करत असेल, ते सदर परिसरातील अंडरग्राउंड केबल किंवा इतर माहिती त्याला आधी घेता येईल. तसेच या परिसरात ज्या कंपनीने आधी अंडरग्राउंड केबल किंवा पाइपलाइनचे काम केले असेल त्या कंपनीचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयटी आणि काँन्टॅक्ट डीटेल्स इत्यादी माहिती मिळू शकते.

हे मोबाइल अ‍ॅप सक्रिय झाल्यानंतर एखाद्या भागात ज्या एजन्सी किंवा कंपनीने खोदकाम केले असेल तिच्याशी आधी संपर्क साधता येईल. त्यामुळे भविष्यातील नुकसान टाळता येईल.

वर्षाचे 3 हजार कोटी वाचणार?

नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेल्या व्हिडिओतून या अ‍ॅपविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, देशात वर्षभरात 10 लाख केबलचं नुकसान होतं. यामुळे 400 मिलियन डॉलर अर्थात 3 हजार कोटी रुपयांचं नुकसान होतं. संबंधित परिसरातील नागरिकांना होणारा त्रास त्याहून जास्त असतो. मात्र हे अ‍ॅप लाँच झाल्यावर सदर नुकसान टाळता येऊ शकतं, असा दावा करण्यात आलाय.

6G वर काम सुरू

विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी इनोव्हेशन सेंटर आणि इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या नव्या प्रादेशिक कार्यालयाचंही उद्घाटन केलं. एकिकडे देशभरात 5G सेवेची पाळंमुळं रुजतायत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G टेस्टिंगची घोषणा केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.