पंतप्रधान मोदी लाँच करणार e-RUPI , सामान्य नागरिकांना काय फायदा मिळणार?

e Rupi | ई-रुपी क्युआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगच्या माध्यमातून काम करणारे ई व्हाऊचर आहे. या कार्डाचा वापर करुन डिजिटल पेमेंट आणि इंटरनेट बँकिंगसारखे व्यवहार करु शकता.

पंतप्रधान मोदी लाँच करणार e-RUPI , सामान्य नागरिकांना काय फायदा मिळणार?
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 10:52 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी डिजिटल पेमेंट सोल्युशन ई-रुपी (e-RUPI) लाँच करणार आहेत. पंतप्रधान या कार्यक्रमाला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावतील. e-RUPI हे एक प्रीपेड व्हाऊचर कार्ड आहे. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशनने (NPCI) हे कार्ड विकसित केले आहे. या कार्डाच्या माध्यमातून कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहार करता येतील.

ई-रुपी क्युआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगच्या माध्यमातून काम करणारे ई व्हाऊचर आहे. या कार्डाचा वापर करुन डिजिटल पेमेंट आणि इंटरनेट बँकिंगसारखे व्यवहार करु शकता. एनपीसीआयच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून e-RUPI कार्ड तयार करण्यात आले आहे.

युनिफाईड पेमेंट इंटरफेस एक रिअल टाईम पेमेंट सिस्टीम आहे. ज्या माध्यमातून मोबाईलच्या साहाय्याने तुमच्या बँक खात्यात तात्काळ पैसे जमा केले जातात. ई-रुपी हे मोबाईल प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले असले तरी ते वापरण्यासाठी मोबाईल APP गरजेचे नाही. बालकल्याण, टीबी निर्मुलन, आयुष्मान भारत, पंतप्रधान आरोग्य योजना, खतांवर अनुदान अशा सरकारी योजनांसाठी e-RUPI कार्डचा वापर केला जाऊ शकतो. तर खासगी क्षेत्रात कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीसाठी e-RUPI च्या डिजिटल व्हाऊचर्सचा वापर केला जाऊ शकतो.

रुपे कार्ड काय आहे?

रुपे भारताच्या डिजीटल व्यवहारात अत्यंत मैलाचा दगड ठरला आहे. कारण, एटीएम व्यवहारासोबतच ऑनलाईन व्यवहारासाठीही रुपेचा वापर केला जात आहे.

Visa, MasterCard, Discover, Dinner Club आणि American Express यांसारख्या कंपन्यांचं जाळं जगभरात आहे. शिवाय बँकांकडूनही हेच कार्ड दिले जातात. बँकांकडून Visa, MasterCard आणि RuPay या कार्डचा पर्याय दिला जायचा. पण अमेरिकन कंपन्यांकडून घेतलं जाणारं कमिशन आणि शुल्क हे सामान्य ग्राहकांना न परवडणारं आहे हे जाणवू लागलं. यानंतर डिजीटल ट्रान्जॅक्शनला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने रुपेवर जास्त भर दिला. रुपेवर आता भारतात कुठेही पैसे काढता येतात, शिवाय कुठेही स्वाईप करुन व्यवहार करता येतात.

इतर बातम्या:

Alert! एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, नेट बँकिंग इतक्या तासांसाठी बंद

SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा, घरबसल्या वारसदाराची नोंदणी करण्याची सुविधा सुरु

SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण, लाभ घेण्यासाठी काय करायचं?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.