‘या’ सरकारी योजनेते 55 रुपये गुंतवा आणि म्हातारपणी प्रत्येक महिन्याला मिळवा 3000 रुपयांची पेन्शन
PM Shram Yogi Yojna | असंघटित क्षेत्रातील नोकरदारांसाठी मोदी सरकारची ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. 18 ते 40 वयोगटातील लोक पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेत गुंतवणूक करु शकतात.
मुंबई: आयुष्यातील उतारवयात निवृत्ती वेतन हा ज्येष्ठांसाठी प्रमुख आर्थिक आधार मानला जातो. मात्र, खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची (Pension) सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे म्हातारपणी पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी खासगी कंपन्यांमधील कर्मचारी पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) या योजनेत गुंतवणूक करु शकतात. (pm shram yogi mandhan yojana)
18 ते 40 वयोगटातील लोक करु शकतात गुंतवणूक
असंघटित क्षेत्रातील नोकरदारांसाठी मोदी सरकारची ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. 18 ते 40 वयोगटातील लोक पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेत गुंतवणूक करु शकतात. त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला PM-SYM खाते उघडावे लागेल. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची गरज असते. हे खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड (Shram Yogi Card) दिले जाते. या योजनेते तुम्ही महिन्याला 55 रुपयांपासून 200 रुपयांची गुंतवणूक करु शकता.
60 वर्षानंतर मिळणार पेन्शन
या योजनेनुसार तुम्ही वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला पेन्शन सुरु होईल. तुम्ही किती पैसे जमा केले आहेत यावर तुमच्या पेन्शनचा आकडा ठरेल. तुम्ही महिन्याला 55 रुपयांच्या हिशेबाने पैसे जमा केले असतील तर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये इतकी पेन्शन मिळेल. तुम्ही वर्षाची पेन्शन एकत्रही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जितके पैसे जमा करता तेवढचे पैसे सरकार जमा करते.
फक्त एकदा करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळेल निश्चित पेन्शन
केंद्र सरकारची वय वंदना योजना ही योजनाही निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासाठी चांगला पर्याय आहे. सध्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट आणि निवृत्ती वेतन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक व्याज मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या योजनेच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. सध्या या योजनेचा व्याजदर आठ टक्क्यांवरून घसरुन 7.4 टक्क्यांवर आला आहे. तर, वार्षिक निवृत्ती वेतनाची पर्याय निवड केल्यास 7.66 टक्के वार्षिक परतावा मिळेल.
वयोवृद्धांना निवृत्ती वेतनासाठी वय वंदना योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. दरवर्षी 1 एप्रिलला सरकारच्या या योजनेच्या परताव्याचा आढावा घेऊन फेरबदल करते. मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर निवृत्तीवेतन घेतले जाऊ शकते.
नव्या सुधारणांनंतर ग्राहकांना दर महिना 1000 च्या निवृत्तीवेतनासाठी किमान 1.62 लाख रुपये गुंतवावे लागतील. तर त्रैमासिक पेन्शनसाठी 1.61 लाख, सहा महिन्यांच्या पेन्शनसाठी 1.59 लाख आणि वार्षिक निवृत्तीवेतनासाठी किमान 1.56 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
संबंधित बातम्या :
तरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का? भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या
मोठं यश! आता हे सॉफ्टवेअर सांगणार कोणत्या रुग्णाला व्हेंटीलेटर आणि आयसीयूची गरज
आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी, काय आहेत नवे नियम, कधीपासून लागू होणार?
(pm shram yogi mandhan yojana)