AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushman Card : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! असा करा आयुष्यमान कार्डसाठी अर्ज

Ayushman Card : 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेत मोफत उपचार घेता येतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येतात.

Ayushman Card : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! असा करा आयुष्यमान कार्डसाठी अर्ज
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 6:22 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : देशातील प्रत्येक वर्गाच्या चांगल्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने खास योजना आणली आहे. मोदी सरकारने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची (Ayushman Bharat Yojana) सुरुवात केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येईल. केंद्र सरकारने ही योजना 23 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु केली होती. या योजनेत किरकोळ उपचारापासून शस्त्रक्रियेचा लाभ घेता येतो.   या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतो. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

काय आहे या योजनेची पात्रता?

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गातील लाखो लोक घेत आहेत. या योजनेचा लाभ आदिवासी (SC/ST) बेघर, निराधार, बेघर, भिकारी, मजूर यांच्यासह अनेक वर्गाला घेता येईल. या योजनेसाठी काय पात्रता आहे, याची माहिती PMJAY च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर Am I Eligible या टॅबवर क्लिक करा. या पेजवर मोबाईल क्रमांक आणि राशन कार्ड क्रमांक नोंदवा. त्याआधारे काही मिनिटांतच तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत की नाही, हे समोर येईल.

हे सुद्धा वाचा

योजनेतंर्गत मिळतात या सुविधा

या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येईल. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करणार. या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे. उपचारासाठी एक रुपया पण द्यावा लागणार नाही.

या कागदपत्रांची आवश्यकता

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • इनकम सर्टिफिकेट
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो

या योजनेसाठी असा करा अर्ज

  1. आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. नवीन नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ वा ‘Apply’ यावर क्लिक करा.
  3. तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती नोंदवा.
  4. माहिती नोंदवल्यानंतर ती पुन्हा एकदा चेक करा.
  5. सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  6. पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
  7. त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.