घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?

Gold Investment | प्रत्येक सणाला थोडंफार सोनं खरेदी केलं जातं. मात्र, यापैकी बहुतांश सोनं वर्षानुवर्षे कपाटाच्या लॉकरमध्ये पडून राहते. त्यावर कोणताही परतावा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काहीप्रमाणात डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते.

घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?
सोने गुंतवणूक
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 12:12 PM

मुंबई: भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व आहे. सोनं म्हणजे मौल्यवान आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे, ही समजूत बहुतांश भारतीयांच्या मनात खोलवर रुजली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही पारंपरिक विचारसरणीचे भारतीय लोक सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. प्रत्येक सणाला थोडंफार सोनं खरेदी केलं जातं. मात्र, यापैकी बहुतांश सोनं वर्षानुवर्षे कपाटाच्या लॉकरमध्ये पडून राहते. त्यावर कोणताही परतावा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काहीप्रमाणात डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते.

मात्र, आता पंजाब नॅशनल बँकेने (PNB) घरातील सोन्यावर पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. PNB बँकेच्या Gold Monetization Scheme मध्ये सोनं ठेवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

किमान किती सोनं जमा करावं लागेल?

सोने चोरीला जाण्याची जोखीम असल्यामुळे अनेकजण ते बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवतात. त्यासाठी तुम्हाला बँकेला शुल्क अदा करावे लागते. मात्र, तुम्ही PNB बँकेच्या सोने चलनीकरण योजनेतंर्गत गुंतवणूक करायची ठरवली तर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी वेगळे बँक लॉकर खरेदी करण्याची गरज उरणार नाही. तसेच तुम्हाला ठराविक व्याजही मिळत राहील. या योजनेत तुम्ही अगदी एक तोळा सोनेही गुंतवू शकता. PNB बँकेच्या Gold Monetization Scheme मध्ये तीन प्रकार आहेत. शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटमध्ये (STBD) 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही सोनं बँकेत गुंतवू शकता. तर मध्यम आणि दीर्घकालीन Gold Monetization Scheme चा कालावधी अनुक्रमे 5 ते 7 वर्षे आणि 12 ते 15 वर्षे इतका आहे.

किती व्याज मिळणार?

PNB बँकेच्या या योजनेत एका वर्षासाठी 0.50 टक्के ते 0.75 टक्के इतके व्याज मिळेल. एका वर्षापेक्षा जास्त पण दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदर 2.25 टक्के इतका राहील. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी 2.50 टक्के इतके व्याज मिळेल. Gold Monetization Scheme मध्ये तुम्ही सोन्याची नाणी, वळी आणि दागिने गुंतवू शकता. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना अर्ज, ओळखपत्र, केवायसी आणि इन्व्हेंटरी फॉर्म भरावा लागेल.

पैसे कधी काढू शकता?

शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटमध्ये (STBD) मध्ये तुम्ही मुदतीपूर्वी सोनं बँकेतून काढल्यास त्यावर दंड भरावा लागेल. एका वर्षाच्या आत तुम्ही सोनं काढल्यास त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही. त्यावर 0.15 टक्के इतके व्याज लागेल. तसेच सोन्याचा परतावा पैशाच्या स्वरुपात किंवा सोन्याच्या स्वरुपातच द्यावा, यासाठी बँकेवर कोणतेही बंधन राहणार नाही.

मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक केलेल्यांनी मुदतीपूर्वी सोनं काढल्यास व्याजावर दंड आकारला जाईल. तरी दीर्घकालीन गुंतवणुकीतही तुम्ही पाच वर्षांनंतर सोनं कधीही परत घेऊ शकता. मात्र, त्यावर दंड भरावा लागेल. या योजनेत सामान्य व्यक्ती, संस्था, धर्मादाय संस्था, खासगी कंपन्या, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणीही गुंतवणूक करु शकते.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.