कर्जाचे हप्ते थकलेत, ‘या’ बँकेची ग्राहकांना कर्जमुक्तीसाठी खास ऑफर

PNB Bank | लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते थकलेल्या या लोकांना पीएनबी बँकेने OTS अर्थात वन टाईम सेटलमेंटची ऑफर देऊ केली आहे. याचा अर्थ या ग्राहकांना विशिष्ट रक्कम भरून कर्जापासून मुक्ती मिळवता येईल.

कर्जाचे हप्ते थकलेत, 'या' बँकेची ग्राहकांना कर्जमुक्तीसाठी खास ऑफर
पीएनबी बँक
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 7:30 AM

मुंबई: कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या आणि व्यवसाय ठप्प झालेल्या लोकांवर सध्या मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. यापैकी अनेकांनी पैशांची आवक व्यवस्थित सुरु असताना बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, आता रोजगारच हिरावला गेल्याने या लोकांना कर्जाचे हप्ते फेडणे मुश्किल होऊन बसले आहे.

अशा ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेने एक खास ऑफर आणली आहे. लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते थकलेल्या या लोकांना पीएनबी बँकेने OTS अर्थात वन टाईम सेटलमेंटची ऑफर देऊ केली आहे. याचा अर्थ या ग्राहकांना विशिष्ट रक्कम भरून कर्जापासून मुक्ती मिळवता येईल. बँकेतील कर्जाच्या अनुत्पादक खात्यांसाठी (NPA) 75 टक्के सूट देण्यात आली आहे. एक लाखांहून अधिक रक्कमेच्या NPA अकाऊंटसवर 60 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जदार 25 ते 40 टक्के रक्कम भरून कर्जाच्या जोखडातून कायमचे मुक्त होऊ शकतात.

काय आहे नेमकी योजना?

* 31 मार्च 2021 पर्यंत बँकेतून कर्ज घेतलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळेल. पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या सर्वांना वन टाईम सेटलमेंट स्कीमचा लाभ उठवता येईल. * यामध्ये 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्याचाही समावेश आहे. * या योजनेतंर्गत व्याज आणि मुदल रक्कमेचा काही भाग माफ करण्यात येईल. * वन टाईम सेटलमेंटसाठी एक ठराविक रक्कम जमा करुन त्यानंतर तुम्ही उर्वरित पैसे हप्त्यांमध्येही फेडू शकता.

कर्जात किती सूट?

तुमच्या डोक्यावर एक लाख रुपयांचे कर्ज असेल तर तुम्हाला 25 ते 50 टक्के सूट मिळेल. एक लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या कर्जावर 25 ते 75 टक्क्यांची सूट मिळेल. तुमच्या कर्जाचा आऊटस्टँडिंग रक्कम 20 ते 50 लाख असेल तर त्यावर 40 ते 80 टक्के सूट मिळेल. तर 50 लाख ते 5 कोटीपर्यंतच्या कर्जावरील सूट सिक्युअर आणि अनसिक्युअर रक्कमेनुसार निश्चित केली जाईल.

संबंधित बातम्या:

Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

Union Bank of Indiaच्या विशेष योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली संधी, क्रेडिट लाईन वाढणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.