शेतकऱ्यांना सावकारांपासून वाचवणार, PNB बँकेचा पुढाकार, जाणून घ्या कर्जासाठी खास योजना

PNB Bank | या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आता शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.

शेतकऱ्यांना सावकारांपासून वाचवणार, PNB बँकेचा पुढाकार, जाणून घ्या कर्जासाठी खास योजना
पीएनबी बँक
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 12:26 PM

नवी दिल्ली: अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे दुष्काळ, महापूर आणि चक्रीवादळ अशा नैसर्गिक संकटांना वारंवार सामोरे जावे लागेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांना कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु, बँकेच्या निकषांमुळे अनेक शेतकरी कर्जासाठी पात्र ठरत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. प्रचंड व्याजदरामुळे गरीब शेतकरी या कर्जाच्या दुष्टचक्रात सापडतात.

या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आता शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. फार्महाऊस, फळबागेची खरेदी, शेतीच्या कामांसाठी लागणारी वाहने आणि डेअरीच्या विकासासाठी पीएनबी बँक कर्ज देईल.

किती कर्ज मिळणार?

या योजनेच्या माध्यमातून पीएनबी बँक लहान शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देईल. लहान शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. हे कर्ज फेडण्यासाठी पाच ते सात वर्षांचा अवधी दिला जाईल. पीएनबी बँकेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

कर्जासाठी कशाप्रकारे अर्ज कराल?

* पीएनबी बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन लोनचा पर्याय निवडावा. * त्यानंतर Agriculture loan new application वर क्लिक करा. * फॉर्ममध्ये सर्व तपशील भरा. * यानंतर फॉर्म सबमिट करावा.

पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया

1) जास्तीचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग तसेच महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातात 2) पिकाची पेरणी झाली की, त्या पिकाची विमा रक्कम अदा करणे आवश्यक आहे. पिकानिहाय ही रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेली असते. 3) पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या संबंधिची माहिती ही कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांना देणे आवश्यक आहे. यानंतर पिक पाहणीसाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. 4) या दरम्यान शेतकऱ्याजवळ सातबारा उतारा, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. 5) पिक पेऱ्याचे क्षेत्र, बाधित क्षेत्र तसेच तुलनेने किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल या कर्मचाऱ्यांकडून तयार केला जातो. 6) पिक पंचनाम्याचा अहवाल हा महसूल विभागाकडे पाठविला जातो. 7) महसूल विभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल हा संबंधित कंपनीकडे पाठविला जातो. मात्र, नुकसान भरपाईसाठी लागवडीच्या क्षेत्रापैकी किमान 25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक आहे. 8) नुकसान अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या बॅंक पासबुकच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम वर्ग केली जाते. पंचनामा कसा केला जातो याची माहिती तलाठी सुदर्शन पाटील यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

दुष्काळात तेरावा : पावसाचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही होणार, शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

पावसामुळे 12 लाख हेक्टरावरील खरिप पाण्यात, सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.