Health Insurance Portability : आरोग्य विमा योजनेला करा पोर्ट, या बाबी ठेवा लक्षात..!
नव्या आरोग्य विमा कंपनीत पोर्टिंग केल्यावर कंपनी आपल्या नियमानुसार प्रीमियम आकारते. कदाचित हा प्रीमियम आधीच्या कंपनीपेक्षा जास्त किंवा कमी असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यासाठी जास्तीचा हप्ता मोजावा लागतो. तम्हीही आरोग्य विमा पोर्ट करू शकता, फक्त या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
मुंबई : मोबाइल क्रमांकाप्रमाणेच तुम्ही आरोग्य विमा योजना (Health insurance policy) ही पोर्ट करू शकता. याला आरोग्य विमा पोर्टेबिलिटी (Portability) असे म्हणतात. जर विद्यमान विमा कंपनीच्या सेवेवर तुम्ही नाखूष असाल अथवा तिचा हप्ता जास्त आहे असे वाटत असेल, दाव्यांचा निपटारा लवकर होत नसेल आणि इतर काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या आरोग्य विमा कंपनीत बदल करु शकता. तुमची आरोग्य विमा पॉलिसी पोर्ट करू शकता. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. लक्षात ठेवा की सर्व प्रकारच्या धोरणांमध्ये पोर्टेबिलिटी नसते.दुसरी कंपनी विम्याची सुविधा देईल आणि ग्राहकाच्या सुविधेनुसार आरोग्य विमा योजनेत बदल करु शकेल .विशेष बाब म्हणजे एका कंपनीतून दुस-या कंपनीत योजना पोर्ट करताना विमा सुरक्षा आणि सुविधा तशीच असेल. ग्राहकांना मिळणारे फायदे (Benefits)नव्या विमा कंपनीतही मिळतील. विमा पोर्टेबिलिटी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, विमा योजना सध्यस्थिती सुरु असावी. ती कोणत्याच कारणाने खंडीत अथवा बंद नसावी . पोर्ट करताना ज्या अटी व नियम आहेत, त्या पूर्ण केल्यानंतरच दुस-या कंपनीत तुमची योजना पोर्ट होते.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कौटुंबिक अथवा वैयक्तिक दोन्ही विमा पॉलिसी पोर्ट केली जाऊ शकतात. पॉलिसीधारक कोणत्याही सामान्य किंवा विशेष विमा कंपनीची पॉलिसी दुसऱ्या सामान्य किंवा विशेष पॉलिसीमध्ये पोर्ट करू शकतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जेव्हा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची वेळ येते, तेव्हा त्याच कालावधीत तुम्ही ते पोर्ट करू शकता. पॉलिसीच्या कालावधीत आरोग्य पॉलिसी पोर्ट करता येत नाही.
पोर्टिंगचे नियम
या धोरणाचे वेळेत नूतनीकरण व्हावे, त्यात खंड पडू नये, ही पोर्टिंगसाठी मोठी अट आहे. मात्र, कंपनीकडून पॉलिसीमध्ये खंड पडल्यास त्यात ग्राहकांची चूक मानली जात नाही आणि पोर्टेबिलिटीला परवानगी दिली जाते. ज्या ग्राहकांना पोर्टेबिलिटी सेवा घ्यायची आहे, त्याने प्रथम आपल्या विद्यमान कंपनीला माहिती दिली पाहिजे. ही विनंती लेखी स्वरूपात द्यावी लागेल आणि ज्या कंपनीत तुम्हाला पोर्ट करायचे आहे, त्या कंपनीचे नाव द्यावे लागेल. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीत पॉलिसी नूतनीकरणासाठी 45 दिवस शिल्लक असताना करावे लागेल. त्यापूर्वी नव्या कंपनीकडे पोर्टसाठी विनंती करावी लागते. आरोग्य धोरण पोर्ट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. नव्या कंपनीत पोर्टिंग केल्यावर कंपनी आपल्या नियमानुसार प्रीमियम आकारते. कदाचित हा प्रीमियम आधीच्या कंपनीपेक्षा जास्त किंवा कमी असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या पॉलिसीमध्ये असे दिसून येते की, जेव्हा ते दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीत पोर्ट करतात तेव्हा त्यांना अधिक प्रीमियम भरावा लागतो. ग्राहकाला हवे असल्यास तो नव्या कंपनीत पॉलिसीची विमा रक्कम वाढवू शकतो.
पॉलिसी पोर्टची प्रक्रिया
पॉलिसी पोर्ट करण्यासाठी 45 दिवसांच्या आत नवीन कंपनीला याविषयीचा अर्ज करावा लागतो. त्यासाठी प्रस्ताव अर्ज (proposal form) भरावा लागतो. अर्जाद्वारे नवीन कंपनीकडे योजना हस्तांतरीत करण्यासाठी विनंती करावी लागते. अर्जात ज्या आरोग्य विमा सेवा पुरविणा-या कंपनीची सेवा नकोय, तिची माहिती द्यावी लागते. पोर्टिंगनंतर लगेचच पॉलिसी नूतनीकरणाची (renewal) प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अधिकचा कालावधी देण्यात येतो.
ही माहिती अदा करावी लागणार
प्रस्तावासोबत विमाधारकाचे नाव आणि अन्य सविस्तर माहिती द्यावी लागते. विम्याविषयी ही माहिती द्यावी लागते. या अर्जासोबत विमा योजना नुतनीकरणासाठीची नोटीस, विम्यावर बोनस नको असेल तर त्याविषयीचा अर्ज, मागील आरोग्य तक्रारींची माहिती, त्यावरील उपचार याविषयीची माहिती द्यावी लागते. नवीन कंपनी अर्ज आणि कागदपत्रांची शहानिशा करते. तसेच पोर्टिंग विनंती स्वीकारावी की नाकारावी याविषयीचा निर्णय घेते. याविषयीची शहानिशा झाल्यानंतर कंपनी आरोग्य विमा पोर्टिंगची अनुमती देते. ग्राहक विद्यमान आरोग्य विमा कंपनीच्या सेवेबाबत समाधानी नसेल तर तो दुस-या कंपनीकडे विमा योजना पोर्टेबिलिटीसाठी अर्ज दाखल करु शकतो.
संबंधित बातम्या :
जुनी की नवी पेन्शन योजना लागू होणार? जाणून घ्या अर्थ राज्यमंत्री काय म्हणाले
तुमचे पॅन आधारला लिंक आहे का? नसेल तर आजच लिंक करा, 31 मार्चनंतर होऊ शकते मोठे नुकसान