Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Investment : 100 रुपयांची ताकद, ही सरकारी योजना पाच वर्षांत करेल 2 लाखांपेक्षा अधिकची बचत

Investment : 100 रुपयांची ताकद तुम्हाला लखपती करु शकते..

Investment : 100 रुपयांची ताकद, ही सरकारी योजना पाच वर्षांत करेल 2 लाखांपेक्षा अधिकची बचत
बचत ठरेल ताकदImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 5:00 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही अल्पबचत योजनेमध्ये (Small Saving Scheme) गुंतवणुकीची सवय लावून घेतली तर ही सवय तुम्हाला लखपती (Lakhapati) केल्याशिवाय राहणार नाही. अनेक बचत योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जोखीम (Risk) तर नाही उलट चांगल्या परताव्याची (Return) हमी मिळते. विशेष म्हणजे या अल्पबचत योजनांमध्ये फार मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही.

पोस्ट ऑफिसची आवर्ती मुदत ठेव योजना (5-Year Post Office Recurring Deposit Account) ही अशीच एक जोखीम नसलेली योजना आहे. या योजनेत केवळ 100 रुपये दररोज बचत केल्यास पुढील पाच वर्षांत तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

या योजनेत दररोज 100 रुपये बचत करणे फायद्याचे ठरेल. RD योजनेत रोजची ही बचत तुम्हाला 2 लाख रुपयांचा निधी देईल. त्यावर चांगले व्याजही मिळेल. म्हणजे पाच वर्षांत ही रक्कम तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरेल.

हे सुद्धा वाचा

पोस्ट खात्याच्या अल्पबचत योजनेत रोज केलेली बचत एक मोठी रक्कम उभी करेल. पोस्ट कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

तुम्ही पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेत 100 रुपयांची बचत कराल तर दोन लाखांच्या वर हा निधी असेल. या अल्पबचत योजनेत प्रत्येक वेळी तुम्ही 10 रुपयांच्या पटीत अथवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची भर घालू शकता. योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.

पोस्टाच्या RD वर सध्या वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळते. या व्याजावर तिमाहीत कपाऊंडिंग मिळते. जर या बचत योजनेत 100 रुपयांची दररोज बचत कराल. तर महिन्याला 3000 रुपयांची बचत होईल. तर पाच वर्षांत 2,09,089 रुपये जमा होतील.

60 महिन्यांमध्ये ही रक्कम 2,09,089 रुपये इतकी होईल. या रक्कमेवर वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळेल. व्याजची रक्कम जमा होऊन, जी रक्कम तयार होईल. त्यावर पुन्हा व्याज मिळेल. एकूण 29,089 रुपये व्याज मिळेल.

पोस्ट खात्यात तुम्हाला एकापेक्षा अधिक RD खाते उघडता येते. एक, तीन व्यक्तीही यामध्ये आवर्ती ठेव खाते उघडू शकतात. तसेच लहान मुलांच्या नावेही आरडी खाते उघडता येते.

तुम्हाला आवर्ती ठेव योजनेवर कर्ज ही घेता येते. 12 हप्ते जमा झाल्यावर त्यावर 50 टक्के कर्ज मिळू शकते. तुम्हाला या खात्यात वारसदारही नेमता येतो.

शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.