पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटवर मिळतेय बँकांपेक्षा जास्त व्याज

Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट हीदेखील त्यापैकीच एक योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास वर्षाला तुमची 13500 रुपयांची करबचत होऊ शकते. इतर योजनांच्या तुलनेत ही करमाफी जास्त आहे.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटवर मिळतेय बँकांपेक्षा जास्त व्याज
कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये 10 हजार जमा केले, तर सध्या 5.8 टक्के व्याज दराने ही रक्कम मॅच्युरिटी झाल्यावर 6,96,967 रुपये होईल. 5 वर्षात एकूण जमा रक्कम 6 लाख रुपये असेल आणि व्याजाची रक्कम रुपये 99967 असेल. अशा प्रकारे परिपक्वता रक्कम सुमारे 7 लाख असेल.
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 6:57 AM

मुंबई: चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सामान्य लोक अल्पबचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात. या सरकारी योजना असल्यामुळे त्यामधील पैसे सुरक्षित राहतील, याची लोकांना खात्री असते. याशिवाय, अशा योजनांवर करमाफीसह इतर अनेक लाभ मिळतात.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट हीदेखील त्यापैकीच एक योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास वर्षाला तुमची 13500 रुपयांची करबचत होऊ शकते. इतर योजनांच्या तुलनेत ही करमाफी जास्त आहे.

व्याजदराबाबत बोलायचे झाले तर पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटवर बँकांच्या तुलनेत जास्त व्याज मिळते. सध्याच्या घडीला बँकांमध्ये तीन टक्क्यांच्या आसपास व्याज मिळत आहे. तर पोस्टात हाच व्याजदर 4 टक्के इतका आहे.

जास्तीच्या करबचतीचा लाभ

ज्या गुंतवणुकदारांना कमी जोखमी पत्कारायची आहे त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. याठिकाणी त्यांना 33 टक्के जास्त व्याज मिळते. तर आयकरात जवळपास 10 हजार ते 13 हजारांची सूट मिळते.

ITR मध्ये कशाप्रकारे द्याल माहिती

वैयक्तिक खात्यावर मिळणारी 3500 रुपयांची अतिरिक्त सूट सेक्शन 80TTA अंतर्गत दिली जाते. त्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना 3500 ते 7000 रुपयांचा टॅक्स क्लेम करता येतो. त्यासाठी उत्पन्न Exempted Income या वर्गवारीत नमूद करावे लागते.

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगचे फायदे

याद्वारे खातेदार घर बसल्या कोणालाही पैसे पाठवू शकतात आणि आपले खाते विवरण पाहू शकतात. याशिवाय आरडी, पीएफ, एनएससी योजनेशी संबंधित सर्व कामे ग्राहक इंटरनेट बँकिंगच्या मदतीने घरी बसून करू शकतात.

इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करण्यासाठीच्या अटी

पोस्टाची इंटरनेट बँकिंग सुविधा वापरण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिस वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वैध एकल किंवा संयुक्त खात्यासह केवायसी संबंधित कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. तसे यासोबत सक्रिय एटीएम कार्ड देखील आवश्यक आहे. ग्राहकाचा मोबाईल नंबर त्याच्या संबंधित खात्याशी जोडलेला असावा. ईमेल आयडी देखील नोदानिकृत असावा. याचबरोबर ग्राहकाचा पॅन नंबर त्याच्या खात्यासह जोडलेला असावा. ज्या व्यक्तीने या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, केवळ तोच खातेदार आपले खाते इंटरनेट बँकिंगद्वारे वापरण्यास सक्षम असेल.

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग कशी सुरू करावी?

त्यासाठी खातेदाराला प्रथम पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. यानंतरच त्याचे नेट बँकिंग सक्रिय होईल. जेव्हा इंटरनेट बँकिंग सक्रिय होईल, तेव्हा आपल्या मोबाईलवर एक एसएमएस अलर्ट येईल.

यानंतर तुम्हाला इंडिया पोस्टच्या नेट बँकिंग साईटवर जाऊन ‘New User Activation’ हायपरलिंकद्वारे ते सक्रिय करावे लागेल. यासाठी तुमचा ग्राहक आयडी किंवा सीआयएफ आयडी व अकाऊंट आयडी असणे आवश्यक आहे

संबंधित बातम्या – 

10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

Post Office ची धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना, फक्त 50 हजार गुंतवा आणि 3300 रुपये मासिक पेन्शन मिळवा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.