Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना, फक्त 50 हजार गुंतवा आणि 3300 रुपये मासिक पेन्शन मिळवा

बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करतात. (Post Office Monthly Income Scheme Benefits Details)

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना, फक्त 50 हजार गुंतवा आणि 3300 रुपये मासिक पेन्शन मिळवा
post-office
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 12:10 PM

Post Office MIS Scheme मुंबई : बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसमधील विविध योजनांमध्ये (Post Office Scheme) गुंतवलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना सुरु करते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका जबरदस्त योजनेबद्दल सागणार आहोत. या योजनेंतर्गत (Post Office MIS Scheme Benefits) तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला पेन्शन म्हणून दरमहिना ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळेल. तसेच मॅच्युरिटीनंतर एकरकमी पैसेही परत केले जातात. (Post Office Monthly Income Scheme Benefits Details)

योजना नेमकी काय?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (Post Office Monthly Income Scheme Account – MIS) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत कमीत कमी 1000 आणि 100 च्या पटींमध्ये रक्कम जमा करता येते. यात तुम्हाला जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा करता येतात. ही मर्यादा एका अकाऊंटसाठी आहे. तर जॉईंट अकाऊंटसाठी कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त तीन जणांना जाईंट अकाऊंट उघडता येते. तसेच, जर मुल अल्पवयीन असेल तर पालकांच्या नावे खाते उघडले जाऊ शकते. तसेच दहा वर्षानंतर मुलाच्या नावेही पोस्ट ऑफिसमध्ये MIS अकाऊंट उघडता येते.

व्याजदर किती?

या योजनेतंर्गत तुम्हाला दर महिना ठराविक रक्कम जमा करावी लागते. सध्या या योजनेवर 6.6 टक्के व्याजदर दिला जातो. हा व्याज वार्षिक आधारावर मोजले जातात. पण जर एखादा खातेदार यावर मासिक व्याजाचा दावा करत नसेल तर त्याला या पैशावरील अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार नाही.

5 वर्षांची मुदत

या पोस्ट ऑफिस योजनेची मुदत 5 वर्ष आहे. हे अकाऊंट उघडल्यानंतर एक वर्ष होईपर्यंत तुम्ही त्यातून पैसे काढू शकत नाही. जर आपण 1-3 वर्षात बंद करु इच्छित असाल, तर तुमच्या मूळ रकमेपैकी 2 टक्के रक्कम वजा केली जाते. त्यासोबतच जर 3-5 वर्षादरम्यान हे अकाऊंट बंद करु इच्छित असाल, तर 1 टक्के दंड कपात केला जाईल.

4.5 लाख जमा केल्यास दर महिना मिळतील 2475 रुपये

MIS कॅलक्यूलेटरच्या नुसार, जर कोणी या खात्यात एकदा 50 हजार रुपये जमा केले तर प्रत्येक महिन्याला 275 रुपये म्हणजे वर्षाला 3300 रुपये मिळतील. तर पाच वर्षात तुम्हाला एकूण 16500 रुपये व्याज मिळेल. त्याचप्रमाणे जर कोणी 1 लाख जमा केले तर त्याला दरमहा 550 रुपये याप्रमाणे दर वर्षाला 6600 रुपये मिळतील. त्याशिवाय पाच वर्षात 33000 रुपये मिळतील. या योजनेत साडेचार लाख रुपये जमा केल्यास दरमहा 2475 रुपये मिळतील. तर वर्षाला 29700 रुपये आणि पाच वर्षांत व्याजदर म्हणून 148500 रुपये उपलब्ध असतील.

मृत्यूनंतर नॉमिनीला मिळेल मूळ रक्कम

या योजनेतील खातेधारक मॅच्युरिटीपूर्वी मरण पावला तर हे खाते बंद होईल. अशा परिस्थितीत मूळ रक्कम नॉमिनी असलेल्या व्यक्तीला परत केली जाते. या योजनेत ठेव केल्यास कलम 80 सी अंतर्गत कपातीचा लाभ मिळणार नाही. तसेच कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून पैसे काढताना किंवा व्याज उत्पन्नावर टीडीएस वजा केला जात नाही. तसेच हे व्याज उत्पन्न पूर्णपणे करपात्र आहे. (Post Office Monthly Income Scheme Benefits Details)

संबंधित बातम्या : 

आजपासून 10, 20, 25, 30 वर्षांनंतर 1 कोटींची किंमत किती असेल? जाणून घ्या

Investment tips : 1 लाख गुंतवले, 1.28 कोटी मिळाले, 20 वर्षात तगडे रिटर्न कसे मिळाले?

वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.