Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टात उघडा PPF खातं, गुंतवणूक सुरक्षित आणि परताव्याची हमी

टपाल खात्याच्या अल्पबचत मुदत योजनेमध्ये PPF खात्याचाही समावेश आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते आणि त्याचा परतावाही चांगला मिळतो.

पोस्टात उघडा PPF खातं, गुंतवणूक सुरक्षित आणि परताव्याची हमी
PPF
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 2:20 PM

मुंबई : नवीन वर्षामध्ये गुंतवणुकीचा संकल्प असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची अल्पबचत मुदत योजना फायदेशीर ठरू शकते. या अल्पबचत योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सोबतच यातील गुंतवणूक ही पूर्णतः सुरक्षित असते. जर बँक दिवाळखोरीत निघाली तर तुम्हाला या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 5 लाख रुपये मिळू शकतात. मात्र टपाल खात्यात केलेली ही गुंतवणूक तुम्हाला बुडवत नाही.

टपाल खात्यातील ही बचत योजना पूर्णतः सुरक्षित असते. याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या बचत योजनेत तुम्ही अत्यंत कमी रकमेपासून गुंतवणूक करू शकता. टपाल खात्याच्या योजनेमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचाही समावेश आहे या योजनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात.

पीपीएफचा व्याजदर

पोस्ट ऑफिस मधील पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणूक केल्यास सध्या 7.1 टक्के  व्याजदर लागू करण्यात आला आहे. दर वर्षी गुंतवणूक रकमेवर कंपाऊंडिंग पद्धतीने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेले आहे.

गुंतवणूक रक्कम

टपाल खात्याच्या अल्पबचत मुदत योजनेअंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये किमान 500 रुपये तर कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकदार सदर रक्कम एक रकमी भरू शकतात अथवा हप्त्याने जमा करू शकतात.

योजनेचा कालावधी

टपाल खात्याच्या अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना 15 वर्षे कालावधीची आहे. 15 आर्थिक वर्षांमध्ये पीपीएफ खाते ग्राह्य धरले जाते.  यामध्ये पहिल्या वर्षाची नोंद होत नाही, योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकदारांपुढे पुढील पर्याय असतात.

  • गुंतवणुकदाराला संबंधित योजनेचे पासबुक घेऊन खाते बंद करण्याचा अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधित गुंतवणूकदार सदस्याला मुदत परताव्याची संपूर्ण रक्कम मिळते.
  • मुदत कालावधी उलटून गेल्यानंतरही गुंतवणूकदार सदर खाते सुरू ठेवू शकतो. त्यातली गुंतवणूक न काढता ही त्याच्या गुंतवणुकीवर दरवर्षीप्रमाणे त्याला व्याज मिळू शकते. तसेच मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदाराला केव्हाही ही रक्कम सदर खात्यातून काढता येते.
  • एवढेच नाही तर मुदत संपण्यापूर्वी खातेदाराला एक वर्ष अगोदर मुदत वाढवण्याचा अर्ज भरता येतो आणि पुढील पाच वर्षाकरता तो मुदत कालावधी वाढवू शकतो यासाठी संबंधित टपाल खात्यात विहित अर्ज करावा लागतो.

मुदतीपूर्वी रक्कम काढता येते

टपाल खात्यातील प्रॉव्हिडंट फंड योजनेमध्ये मुदतपूर्व योजना बंद करण्याची अनुमती मिळते. मात्र ही अनुमती योजना सुरू होण्याच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी आणि पाच वर्षानंतर मिळते. अचानक उद्भवलेले आर्थिक खर्च किंवा अनुषंगिक खर्च, आपत्कालीन स्थितीत खातेधारकाला मुदतपूर्व योजना बंद करता येते अथवा खातेदाराचा निवासी पत्ता बदलला असेल किंवा तो दुसऱ्या शहरात राहण्यासाठी गेला असेल तर सदर योजना मुदतपूर्व बंद करता येते. ही योजना गुंतवणुकदारांसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवून देणारी आहे. मात्र अधिक परतावा अपेक्षित असणाऱ्या गुंतवणुकदारांना यामध्ये भ्रमनिरास होऊ शकतो.

हेही वाचा :

युनियन आणि सेंट्रल बँकांची ग्राहकांसाठी खास योजना, 9 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्याजने व्यक्तिगत कर्ज 

असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

डिजिटल करन्सीसाठी चालू वर्ष कसे राहणार?; जाणून घ्या क्रिप्टोमधील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञाचे मत

2021 मध्ये शेअर बाजारामधून चांगला परतावा; गुंतवणूकदार झाले मालामाल, चालू वर्षातील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञांचं मत काय?

(Post office PPF public provident fund scheme know interest rate features)

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.