पोस्टाच्या या स्किममध्ये गुंतवणूक करा, 10 लाख मिळवा; काय आहे प्रक्रिया?
पोस्टाची आरडी योजना भविष्यासाठी पैसे जमा करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत दरमहा 7000 रुपये गुंतवून 5 वर्षात 4,99,564 रुपये मिळवता येतात. तेच पैसे दहा वर्ष गुंतवले तर 10 लाख रुपये मिळवणे शक्य आहे. या योजनेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. आरडी स्किम ही पैसे बचत आणि गुंतवणुकीचे सोपे आणि सुरक्षित साधन आहे.
आजच्या घडीला आपण प्रत्येकजण कमावत असलेला पैश्यातून थोडीशी सेव्हिंग करत असतो. कारण गरजेच्या वेळी आपल्याला त्याचा फार मोठा फायदा होत असतो. बचत करणे हा आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या अत्यंत महत्वाचा भाग बनलेला आहे. म्हणून आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवणूक करत असतो. जेणेकरून भविष्यासाठी तुम्हाला त्या पैश्याचा फायदा होईल.
आज अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. तर काही लोक शेअर बाजारात पैसे गुंतवतात, कोणी बँकेच्या एफडीमध्ये पैसे जमा करतात. कोणी सरकारी बचत योजनेत पैसे जमा करत असतात. तुम्ही सुद्धा भविष्यासाठी पैसे बचतीसंदर्भात पर्याय शोधत असाल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसची एक योजना खूप उपयोगी पडू शकते. यामध्ये गुंतवणूक करून 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करा
पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या गुंतवणुकीच्या स्कीम असतात. त्यात तुम्ही सुद्धा उत्तम गुंतवणुकीचा मार्ग शोधत असाल तर मग पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट स्कीम तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. कारण तुम्ही या योजनेत दरमहा 7 हजार रुपये जमा केल्यास तुम्हाला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमधील गुंतवणुकीवर 6.7% टक्के दराने व्याज देते. त्यानंतर तुम्ही 5 वर्षात 4,20,000 रुपये जमा करू शकता.
तर 5 वर्षात 6.7% टक्के व्याजदराने व्याजाची रक्कम मोजली तर ती 79,564 रुपये म्हणजेच एकूण 4,99,564 रुपये तुम्ही मिळवू शकता. पण त्याचवेळी तुम्ही या योजनेला पाच वर्षांसाठी मुदतवाढ द्या. त्यानंतर तुम्ही जवळपास 10 लाख रुपये जमा करू शकता.
या योजनेत खाते कसे उघडावे?
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यानंतर योजनेचा अर्जफॉर्म घेऊन तो भरून द्यावा लागेल. त्याबरोबर लागणारी आवश्यक कागदपत्रे , पासपोर्ट साइज फोटो, अॅड्रेस प्रूफ, पॅन कार्ड अशा कागदपत्रांसह फॉर्म पूर्णपणे भरा. यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे रिकरिंग डिपॉझिट खाते उघडले जाईल. यानंतर तुम्ही गुंतवणूक करून पैसे बचत करू शकता.