AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना, 100 रुपयांपासूनही गुंतवणूक..असे कमवा 16 लाख..

Post Office | पोस्ट खात्याच्या आवर्ती ठेव योजनेत केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करु शकते. म्हणायला अल्पबचत योजना असली तरी सुरक्षितेतसह व्याजदर ही चांगला असल्याने जबरदस्त परतावा मिळतो.

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना, 100 रुपयांपासूनही गुंतवणूक..असे कमवा 16 लाख..
आवर्ती ठेव योजनाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 4:28 PM

Post Office | पोस्ट खात्याच्या (Post Office) अनेक अल्पबचत योजना (Small Saving Scheme) आहे. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. पोस्टाची आवर्ती ठेव योजना (Post office Recurring Deposit) अशी लोकप्रिय आहे. अल्पबचत योजना असली तरी सुरक्षितेतसह व्याजदर ही चांगला असल्याने जबरदस्त परतावा मिळतो.

अवघ्या 100 रुपयांपासून सुरुवात

पोस्टाच्या योजनेत तुम्ही अवघ्या 100 रुपयांपासून सुरुवात करु शकतात. या पट्टीत तुम्हाला गुंतवणूक करता येते. जेवढी जास्त गुंतवणूक कराल तेवढा परतावा जास्त मिळेल.

3 महिन्याला व्याज

आवर्ती ठेव योजना ही पोस्टाची अल्पबचत योजना आहे. या योजनेत तुम्हाला 1,2 अथवा अधिक वर्षांसाठी रक्कम गुंतवता येते. मुदत ठेवीसारखी एकरक्कमी गुंतवणूक करण्याची गरज नसल्याने तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवू शकता. जमा रक्कमेवर तुम्हाला दर 3 महिन्याला व्याज देण्यात येते.

हे सुद्धा वाचा

सध्या व्याजदर किती

पोस्टाच्या या योजनेत सध्या 5.8 टक्के व्याज मिळते. हे व्याजदर एप्रिल 2020 पासून लागू आहेत. जेवढा गुंतवणुकीचा कालावधी जास्त तेवढा फायदा मिळतो.

व्याजदर वाढीची शक्यता

सध्या अनेक बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केलेली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पोस्टाच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर ही वाढतील अशी आशा आहे.

कोण उघडू शकते खाते

आवर्ती ठेव योजनेत 18 वर्षांवरील कोणत्याही भारतीय नागरिकाला खाते उघडता येते. पालक त्यांच्या मुलांच्या नावेही खाते उघडू शकतात.

कर्जाची सुविधा

आवर्ती ठेव योजनेत तुम्हाला कर्जाची सुविधा पण मिळते. 12 महिने रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येतो. एकूण रक्कमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज घेता येते.

16 लाख कसे मिळवाल

दर महिन्याला 10 हजार रुपये जमा केल्यास आणि ही गुंतवणूक पुढील 10 वर्षे खंडीत न ठेवता सुरु ठेवल्यास तुम्हाला 16 लाख रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजेच एखाद्या म्युच्युअल फंडात जशी SIP द्वारे गुंतवणूक करता. तशीची दरमहिन्याला ही बचत करता येईल.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...