Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत हजारांची बचत, 10 वर्षांतच दामदुप्पट..

Scheme | पोस्ट खात्यातील योजनेत हजार रुपयांची बचत तुम्हाला दहा वर्षांतच मालामाल करु शकते. योजनेतील गुंतवणूकही सुरक्षित समजण्यात येते.

Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत हजारांची बचत, 10 वर्षांतच दामदुप्पट..
या खात्यात रक्कम दामदुप्पटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 5:28 PM

नवी दिल्ली : पोस्ट खात्याच्या (Post Office) अल्पबचत योजना (Small Saving Scheme) लोकप्रिय आहेत. या योजनेतील गुंतवणुकीची केंद्र सरकार हमी घेते. बँक बुडाली तर केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच मदत मिळते. पण पोस्टातील गुंतवणूक (Investment) जोखमीच्या बाहेर आहे. पोस्ट खात्यातील योजनेत हजार रुपयांची बचत तुम्हाला दहा वर्षांतच मालामाल करु शकते. त्याविषयी जाणून घेऊयात..

पोस्टातील गुंतवणूक अल्पबचत योजनेत मोडते. त्यामुळे गुंतवणुकीची सवय लागते. तसेच भविष्य काळात ही गुंतवणूक विशिष्ट उद्देशांसाठी वापरता येते. विशेष म्हणजे व्याजदर जोरदार असल्याने या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

पोस्ट कार्यालयामार्फत गुंतवणुकीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यामध्ये मुदत ठेव योजना, आवर्ती ठेव योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा

या सर्व योजना लोकप्रिय असल्याने भारतीय लोक या योजनेत गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीवर प्राप्तीकर कायद्यातंर्गत सवलतही मिळते. त्यामुळे गुंतवणूक होते. चांगला परतावा मिळतो. तसेच कर बचत ही करता येते.

तर टपाल खात्याच्या किसान विकास पत्र योजनेतील (KVP) गुंतवणुकीतून तुम्हाला 10 वर्ष 4 महिन्यात रक्कम दामदुप्पट मिळते. या योजनेत गुंतवणुकीवर वार्षिक 6.9 टक्के व्याज मिळते. त्यामुळे अवघ्या 124 महिन्यात ही रक्कम दुप्पट होते.

या योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करु शकते. केव्हीपीमध्ये गुंतवणुकदाराला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

केव्हीपी योजनेत एक, अथवा तीन व्यक्तींना मिळून संयुक्त खाते उघडता येते. अल्पवयीन अथवा भोळसर व्यक्तीला ही खाते उघडता येते. त्यासाठी पालकाची आवश्यकता आहे. खाते हस्तांतरणाचाही पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस अथवा सहखातेदाराच्या नावे खाते हस्तांतरीत होते.

काही अटी व शर्तींवर हे खाते केव्हाही बंद करता येते. खातेदाराचा अथवा संयुक्त खात्यातील भागीदारांचा मृत्यू ओढावल्यास खाते बंद करता येते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.