Post Office Scheme : पोस्टाची खास योजना, 50 हजार रुपये भरा आणि महिन्याला 3300 रुपयांची पेन्शन मिळवा
post office | पोस्टाच्या अनेक योजना ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकी एक असणारी योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली स्कीम योजना. पोस्ट ऑफिस MIS या नावाने ही योजना लोकप्रिय आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना अत्यंत उत्तम परतावा मिळतो.
मुंबई: अलीकडच्या काळात गुंतवणुकीचा चांगला आणि हमखास परतावा देणारे अनेक पर्याय असले तरी जुन्या पिढीतील लोकांच्या मनात पोस्ट ऑफिसातील गुंतवणूकविषयी एक वेगळ्याच विश्वासाची भावना आहे. किंबहुना देशातील एक मोठा वर्ग आजही पैशांच्या सुरक्षिततेसाठी पोस्टात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतो. पोस्टाच्या अनेक योजना ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकी एक असणारी योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली स्कीम योजना. पोस्ट ऑफिस MIS या नावाने ही योजना लोकप्रिय आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना अत्यंत उत्तम परतावा मिळतो.
Post Office MIS योजनेचा वार्षिक व्याजदर 6.6 टक्के इतका असून तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळते. Post Office MIS योजनेत एका व्यक्तीसाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा 4.5 लाख इतकी आहे. तर जॉईंट अकाऊंटसाठी कमाल मर्यादा नऊ लाख रुपये इतकी आहे. योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असतो.
योजना नेमकी काय?
या योजनेत कमीत कमी 1000 आणि 100 च्या पटींमध्ये रक्कम जमा करता येते. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त तीन जणांना जाईंट अकाऊंट उघडता येते. तसेच, जर मुल अल्पवयीन असेल तर पालकांच्या नावे खाते उघडले जाऊ शकते. तसेच दहा वर्षानंतर मुलाच्या नावेही पोस्ट ऑफिसमध्ये MIS अकाऊंट उघडता येते.
5 वर्षांची मुदत
या पोस्ट ऑफिस योजनेची मुदत 5 वर्ष आहे. हे अकाऊंट उघडल्यानंतर एक वर्ष होईपर्यंत तुम्ही त्यातून पैसे काढू शकत नाही. जर आपण 1-3 वर्षात बंद करु इच्छित असाल, तर तुमच्या मूळ रकमेपैकी 2 टक्के रक्कम वजा केली जाते. त्यासोबतच जर 3-5 वर्षादरम्यान हे अकाऊंट बंद करु इच्छित असाल, तर 1 टक्के दंड कपात केला जाईल.
4.5 लाख जमा केल्यास दर महिना मिळतील 2475 रुपये
MIS कॅलक्यूलेटरच्या नुसार, जर कोणी या खात्यात एकदा 50 हजार रुपये जमा केले तर प्रत्येक महिन्याला 275 रुपये म्हणजे वर्षाला 3300 रुपये मिळतील. तर पाच वर्षात तुम्हाला एकूण 16500 रुपये व्याज मिळेल. त्याचप्रमाणे जर कोणी 1 लाख जमा केले तर त्याला दरमहा 550 रुपये याप्रमाणे दर वर्षाला 6600 रुपये मिळतील. त्याशिवाय पाच वर्षात 33000 रुपये मिळतील. या योजनेत साडेचार लाख रुपये जमा केल्यास दरमहा 2475 रुपये मिळतील. तर वर्षाला 29700 रुपये आणि पाच वर्षांत व्याजदर म्हणून 148500 रुपये उपलब्ध असतील.
मृत्यूनंतर वारसदाराला मिळेल मूळ रक्कम
या योजनेतील खातेधारक मॅच्युरिटीपूर्वी मरण पावला तर हे खाते बंद होईल. अशा परिस्थितीत मूळ रक्कम वारसदार असलेल्या व्यक्तीला परत केली जाते. या योजनेत ठेव केल्यास कलम 80 सी अंतर्गत कपातीचा लाभ मिळणार नाही. तसेच कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून पैसे काढताना किंवा व्याज उत्पन्नावर टीडीएस वजा केला जात नाही. तसेच हे व्याज उत्पन्न पूर्णपणे करपात्र असते. (Post Office Monthly Income Scheme Benefits Details)
संबंधित बातम्या:
आजपासून 10, 20, 25, 30 वर्षांनंतर 1 कोटींची किंमत किती असेल? जाणून घ्या
Investment tips : 1 लाख गुंतवले, 1.28 कोटी मिळाले, 20 वर्षात तगडे रिटर्न कसे मिळाले?
वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?