Post Office RD Account Scheme : एकाच योजनेत तीन फायदे, गुंतवणुकीवर कर्जासह चांगल्या परताव्याची हमी

Post Office RD Account Scheme | टपाल खात्याच्या आवर्ती ठेव योजनेत (RD Account) गुंतवणुकीवर चांगल्या परताव्यासोबतच कर्जाची ही सोय मिळते.

Post Office RD Account Scheme : एकाच योजनेत तीन फायदे, गुंतवणुकीवर कर्जासह चांगल्या परताव्याची हमी
आवर्ती ठेव योजनेत तीन तीन फायदेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 7:30 AM

Post Office RD Account Scheme | टपाल खात्याची आवर्ती ठेव योजना ( Post Office Recurring Deposit Yojana ) सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत चांगली आणि उपयुक्त योजना आहे. या योजनेमुळे नियमीत बचतीची सवय तर लागतेच. परंतू, कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक मोठी रक्कम ही आपल्या गाठीशी राहते. आरडी (RD Account)सुरु झाल्यानंतर पाच वर्षे अथवा 60 महिन्यानंतर मॅच्यूअर होते. विशेष म्हणजे तीन वर्षानंतर आवर्ती ठेव खाते बंद ही करता येते. खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर जमा रक्कमेवर 50 टक्के कर्ज ही घेता येते. पोस्ट खात्यातील गुंतवणूक ही सर्वकालीन सुरक्षित मानल्या जाते. टपाल खात्यातील अल्पबचत योजना ( Saving Scheme )सुरक्षित गुंतवणूक मानण्यात येते. कोणत्याही जोखमेशिवाय यातील गुंतवणूक नागरिकांना चांगला परतावा देतात. तसेच या योजनांवर कर सवलतीसह इतर ही अनेक फायदे मिळतात.

या अल्बबचत गुंतवणूक योजना ( Post Office Saving Yojana )गुंतवणूकदारांना बँकेतील मुदत ठेवीपेक्षा (FD)चांगला परतावा तर देतातच पण गुंतवणुकीची हमी ही देतात. जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखात असाल तर पोस्टाची आरडी योजना तुमच्यासाठी चांगली आहे.

टपाल खात्याच्या आरडीची माहिती

सध्या आवर्ती ठेव योजनेवर (Recurring Deposit Yojana) टपाल खाते चांगला परतावा देत आहे. कोणताही भारतीय नागरीक, 10 वर्षे पूर्ण मुलापासून या योजनेत गुंतवणूक करु शकतात. त्याचे आवर्ती खाते तो उघडू शकतो. भारतीय टपाल खात्याच्या ( Indian Post Office ) संकेतस्थळानुसार, आरडी खात्यात कमीत कमी 100 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागते. अधिकत्तम दहाच्या पटीत गुंतवणूक करता येऊ शकते. त्यावर व्याजदर ही चांगला मिळतो.

हे सुद्धा वाचा

दर तिमाही व्याज

भारतीय टपाल खात्याच्या आवर्ती ठेव य़ोजनेत जुलै 2022 पासून 5.8 टक्के वार्षिक दराने व्याज मिळते. ( Post Office RD Interest Rate ) , याचे व्याजदर सरकार दर तिमाही ठरवते. अल्पबचत योजनांवर ही सरकार व्याज किती द्यायचे याचा निर्णय घेते.

आरडीवर कर्ज

आरडी खाते उघडल्यानंतर पाच वर्षे ते 60 महिन्यानंतर ते परीपूर्ण होते. गुंतवणूकदारांना तीन वर्षांनतर टपाल खात्यातील आरडी खाते बंद करता येते. तसेच खाते उघडल्याच्या एका वर्षानंतर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज (RD Loan) उचलता येते. खाते परिपक्व होण्याअगोदर एक दिवस जरी बंद करण्यात आले तरी त्यावर पोस्ट खाते व्याजदरानुसार रक्कम परत करते हे या खात्याचे वैशिष्ट्ये आहे. पोस्ट कार्यालयाचे आवर्ती ठेव खाते मॅच्युरिटीच्या तारखेपासून पुढील 5 वर्षे कोणत्याही बचतीशिवाय सुरु ठेवता येते.

महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.