Post office Scheme : आकर्षक योजना, मिळेल जबरदस्त व्याज, एफडी तर विसरुनच जा

Post office Scheme : मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा या योजनांमध्ये मिळत आहे. त्यामुळे एफडीत ठराविक मुदतीसाठी रक्कम गुंतविण्यापेक्षा या योजना तुम्हाला मालामाल करतील.

Post office Scheme : आकर्षक योजना, मिळेल जबरदस्त व्याज, एफडी तर विसरुनच जा
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 10:33 AM

नवी दिल्ली : भारतीय गुंतवणूकदार आजही परंपरागत गुंतवणुकीवर विश्वास ठेवतो. जोखीमेशिवाय परतावा मिळणाऱ्या अनेक योजना भारतात लोकप्रिय आहेत. पण मुदत ठेवीपेक्षा अधिक परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसमधील बचत योजना फायदेशीर ठरु शकतात. या योजनांवर तुम्हाला आकर्षक व्याज (Interest Rate) मिळेल. विशेष म्हणजे या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सुरक्षेची तर हमी मिळतेच पण कर सवलतीचा लाभ ही मिळेल. पोस्ट खात्यातील काही योजनांवर (Post Office Scheme) केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. त्याचा गुंतवणूक करताना मोठा फायदा मिळतो. सध्या पोस्ट खात्याच्या विविध बचत योजनांमधील व्याजदर जवळपास सर्वच बँकांपेक्षा जास्त आहे. गुंतवणूक करताना या योजनांचा विचार करता येऊ शकतो.

सध्या 9 योजना पोस्ट खाते सध्या विविध 9 योजना चालविते. अल्पबचत योजना (Small Saving Schemes) मध्ये पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यांचा समावेश आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यानंतर यावरील व्याजदर निश्चित करते. यातील अनेक योजना एफडीतील व्याजदरापेक्षा (FD interest rate) जास्त परतावा मिळतो.

मुदत ठेव योजना पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. पोस्टाच्या अल्पबचत योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेत पाच वर्षांपर्यंत बचत करता येते. या पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना आता 7.5 टक्के व्याज मिळते. 1 एप्रिल 2023 पासून हे व्याजदर लागू करण्यात आले आहे. ही योजना तुम्ही पुढे पाच वर्षांसाठी वाढवू शकता. त्यामुळे दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीवर जोरदार परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

इतका जबरदस्त परतावा जर तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेवीत 10 लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 14,49,948 रुपये मिळतील. यामध्ये 4,49,948 रुपये व्याजाची रक्कम असेल. म्हणजे पाच वर्षांतच तुम्हाला व्याजापोटी 4.5 लाख रुपये मिळतील.

पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बचत योजना सुरु केली आहे. यामध्ये सीनिअर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना लोकप्रिय आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. ही योजना तुमच्या बचतीवर 8.2 टक्के व्याज देते. या योजनेतील गुंतवणुकीवर कसलीही जोखीम नसते.

पोस्ट ऑफिस बचत योजनेतंर्गत विविध पर्याय उपलब्ध आहेत. बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, मासिक योजना, बचत प्रमाणपत्रे इत्यादी. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात. आता तर गुंतवणूकदारांना ऑनलाईनही अर्ज करता येतो.

पोस्ट ऑफिस बचत खाते रोखीनेच उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेश आणि एटीएमची सुविधाही देण्यात येते. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरीत करता येते. बचत खात्यावर व्याजही मिळते.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (SCSS) 8% व्याज दर मिळते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेवर 7.7% व्याज देण्यात येते. या योजनेत कमीत कमी 100 रुपये आणि एका वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.